अजित पवार यांचा आघाडीवर निशाणा:म्हणाले, संविधानाबाबत खोटा नरेटीव्ह सेट केला होता; संविधानाचा सर्वांनाच आदर

2 hours ago 1
लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत खोटा नरेटीव्ह सेट करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकलो नाही. देशात सर्वच लोक हे संविधानाचा आदर करतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत चुकीचा प्रचार करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारच्या वतीने आज 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना 26/11 हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्राने या हल्ल्यामध्ये चांगल्या दर्जाचे अधिकारी गमावले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. आम्हाला संविधानाबद्दल अतिशय आदर आहे. आम्ही आता संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाचे वाचन केले. संविधानाचा भारतातील सर्वांनाच आदर आणि अभिमान असण्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र लोकसभेच्या वेळी विरोधकांनी फेक नरेटीव्ह सेट केला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी महाविकास आघाडी आघाडीवर टीका केली आहे. मुख्यमंत्री राजीनामा देतील, नंतर राज्यपाल आमंत्रण देतील सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी राजीनामा देण्यासाठी राज्यपाल यांची भेट घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यानंतर राज्यात काळजीवाहू सरकार म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली जाईल, ही पद्धत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर राज्यपाल महायुतीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देतील, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या खासदारांची दिल्लीत लॉबिंग:नरेंद्र मोदींकडे मागितली भेटीची वेळ, माजी खासदारांचाही समावेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. विद्यमान खासदारांसोबत या शिष्टमंडळामध्ये काही माजी खासदारांचा देखील समावेश असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी या खासदारांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article