लग्नाच्या रम्य आठवणी कायम लक्षात राहाव्यात म्हणून अनेक जण आपल्या परंपरा आणि ऐपतीप्रमाणे विविध प्रकारे लग्न सोहळे साजरे करतात. महाराष्ट्रातील निवडणूकात आपण राजकीय नेत्यांना सभांसाठी हॅलिकॉप्टरमधून फिरताना पाहीले असेल. परंतू महाराष्ट्राची एक लेक चक्क हॅलिकॉप्टरमधून सासरला निघाल्याचा सोहळा चांगलाच चर्चेत आहे.
Bride leaves for her in-laws' location by chopper successful Chalisgaon, Jalgaon
लग्नाच्या रेशीम गाठी स्वर्गात जुळतात असे म्हटले जाते. पती-पत्नी सात फेरे घेऊन सात जन्म सुखाने राहण्याची शपथ घेऊन देवा- ब्राह्मणांच्या साक्षीने एकमेकांचे होतात. अनेक लग्नात वरात कधी घोड्यावरुन कधी आलिशान कारमधून निघत असते. काही जण आणखी काही वेग- वेगळी वाहने आणतात. हा सोहळा कायमचा स्मरणात राहण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित असतात. असाच एक आगळावेगळा सोहळा रंगला होता. या लग्नात नवरीला सासरी नेण्यासाठी नवरदेवाने चक्क हॅलिकॉप्टर मागवले होते. मग गावातील सगळी मंडळी हा सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी हॅलिपॅडवर जमली होती. पाहा कुठे घडले हे आगळेवेगळे लग्न….
आपण निवडणूकात राजकीय नेत्यांना प्रचार सभांसाठी हॅलिकॉप्टरमधून उतरताना पाहीले असेल, परंतू जळगाव येथील चाळीसगावात नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने चक्क हॅलिकॉप्टरच आणले. मग काय सगळं गाव लाडक्या नवरीला निरोप देण्यासाठी हॅलिपॅडवर पोहचले. आणि साश्रूनयनांनी नवरीने माहेरच्या मंडळींना निरोप दिला. हा लग्न सोहळा पंचक्रोशीत गाजला. चाळीसगावातील अशाच एक लग्न सोहळ्याची चर्चा सुरु आहे.
हे सुद्धा वाचा
आनंदमयी सोहळा
लग्न म्हणजे दोन जीवांच्या मिलनाचा आनंदमयी सोहळा असतो. आपल्या लग्नाच्या आठवणी अविस्मरणीय राहाव्यात यासाठी प्रत्येकजण काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असतो. चाळीसगावमध्ये सध्या अशाच एका हटके लग्नाची चांगलीच चर्चा आहे.चाळीसगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी भिकन रामचंद्र परदेशी यांची नात प्रिया हिचा विवाह सोहळा सोमवारी चाळीसगाव येथील कोदगाव चौफुली येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. छत्रपती देविसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चेतन ठाकूर यांच्यासोबत प्रिया हीचा विवाह संपन्न झाला. संभाजीनगर येथील मोठे व्यावसायिक असलेल्या नवरदेवाने सरप्राइज देत चक्क हेलिकॉप्टरने नववधूला आपल्या घरी( गंगापूर ) नेले. गावात प्रथमच असा एक अनोखा सोहळा पार पडला.यावेळी समस्त रांजणगावकर आपल्या गावाच्या मुलीला प्रेमाने निरोप द्यायला हेलिपॅडवर उपस्थित होते. यावेळी रांजणगावकरांनी नवदाम्पत्याला त्यांच्या भावी सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.