पाझर तलाव फुटला, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान:नुकसानग्रस्त भागाची जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन दहितेंकडून पाहणी

1 day ago 2
दोन दिवसांपूर्वी साक्री मंडळात झालेल्या ५० मिमी मुसळधार पावसामुळे साक्री तालुक्यातील पेरेजपूर शिवारातील पाझर तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. आज सदर नुकसानग्रस्त भागाची धुळे जिल्हा परिषद कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते यांनी पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामा करून मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना धीर देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावरून पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच साक्री पेरेजपूर रस्त्यावरील पाइप मोरीचा भराव वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांचे व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने दहिते यांनी तत्काळ रस्त्याच्या ठेकेदाराला सांगून वाहतूक सुरळीत होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू केले. तसेच विजेचे खांब कोलमडल्याने विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. त्यामुळे विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तलावाच्या दुरुस्तीसाठी सतत प्रयत्नशील दरम्यान, दहिते यांनी सांगितले की जलसंधारण विभागाशी तत्काळ सर्व बाबींचा पाठपुरावा करून पाझर तलावाची दुरुस्ती करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. यावेळी साक्री तालुका शेतकी संघाचे व्हाइस चेअरमन प्रदीपकुमार नांद्रे, सरपंच रमेश सरक, पं.स. माजी गटनेते उत्पल नांद्रे, सागर काकुस्ते, हरीश शेवाळे आदी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article