पातूर तालुक्यात शेतकऱ्यांना डिसेंबरपासून पाणी:पातूरात कालवा सल्लागार समितीच्या सभेत निर्णय

2 hours ago 1
पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जलाशयातून सिंचनासाठी पाणी मिळण्याचा महत्त्वाचा निर्णय २९ नोव्हेंबरला पातूर येथील लघुपाटबंधारे शाखा आयोजित कालवा सल्लागार समितीच्या सभेमध्ये घेण्यात आला. या सभेत जलाशयातून शेतकऱ्यांना एक डिसेंबर २०२४ पासून पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे लाभ वाढणार असून, शेतीतील उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. सभेमध्ये उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, कार्यकारी अभियंता अमोल वसूलकर, शाखा अभियंता सागर माहुरे, आयुषी अग्रवाल, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष हाजी सय्यद बुरहान,अबुल हसन खान, पंचायत समिती सदस्य अनिल राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अर्जुन टप्पे यांच्यासह पाणी वापर संस्था आणि पंचायत समिती सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. मोर्णा प्रकल्प, निर्गुणा प्रकल्प आणि गावंडगाव प्रकल्पासारख्या प्रकल्पांवर सिंचनाची सुविधा आणि पाणी वापर वाढवण्याबाबत सखोल चर्चा झाली. या प्रकल्पांवरील कामांचे परिणामकारक नियोजन आणि प्रकल्पांच्या विकासावरही चर्चा करण्यात आली. यानंतर एक डिसेंबरपासून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी वितरणाच्या संदर्भात पाच पाड्या ठरवण्यात आल्या. याशिवाय, पाणीपट्टी वसुली आणि सिंचन क्षेत्र वाढवण्याबाबत सल्लागार समितीने सर्व संबंधितांना प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. सिंचन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठी समितीने वेळोवेळी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष आणि संबंधित संस्थांना सिंचन वाढवण्याबाबत आणि वसुलीबाबत निर्देश देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, हाजी सय्यद बुरहान ठेकेदार आणि उपविभागीय अधिकारी अनिल राठोड यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. या वेळी एम. डी. तराळे, जे.डब्ल्यू. सावंत, के. बी.तरोळे,पंकज राठोड, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी, पाणी वापर संस्था सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article