पातूर येथे दसरा मैदानावर 31 फूट उंच रावणाचा पुतळा दहन:श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक‎

3 days ago 3
येथील श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दसरा मैदानावर रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम व्यायामशाळा आणि दसरा महोत्सव समितीतर्फे रेणुका गडाच्या पायथ्याशी दसरा मैदानावर पार पडला. रावण दहन आ. नितीन देशमुख, माजी आमदार बळीराम शिरस्कर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव तायडे, पातूर येथील सामाजिक कार्यकर्ते रितेश फुलारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे, शिवाजी महाराज व्यायाम शाळेचे वस्ताद चंदू वस्ताद वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी मंगेश गाडगे होते. याप्रसंगी देवीची महाआरती प्रा. विलास राऊत, गोपाल राऊत, संजय राऊत, मनोज राऊत, आकाश गाडगे यांच्या संचाने गायन केली. याप्रसंगी श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेतील तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार सत्कार करण्यात आला. गोंधळ कार्यक्रम उदय गवळी यांनी सादर केला तर जगदंबा देवीची पूजा देवकर आणि त्यांचे कुटुंबाने केली. सूत्रसंचालन किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी केले. आभार नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजू उगले यांनी केले मानले. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रामलीलेचे सादरीकरण केले. देवीचा गोंधळ सुद्धा सादर केला. पातूर येथील जीवन धवणे यांनी साकारलेली हनुमंताची प्रतिमा विशेष आकर्षण ठरली. हे सादरीकरण गोपाल गाडगे आणि किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे कार्यकर्ते, दसरा उत्सव समितीचे कार्यकर्ते ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article