पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप:भूकंपाचे केंद्रबिंदु 5 किमी जमिनीखाली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

3 days ago 2
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. डहाणू व तलासरी तालुक्यातील गावांना मंगळवारी दुपारी 4 वाजून 47 मिनिटाला 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटर खोल, डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाच्या या धक्क्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच भूकंपाचे धक्के बसत असताना नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. 2018 पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही महिन्यात भूकंपाचे धक्के थांबले होते, मात्र मंगळवारी पुन्हा धक्के बसल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. मंगळवारी दुपारी 4 वाजून 47 मिनिटाला 3.5 रिश्टर स्केल नोंद झालेल्या भूकंपाचा धक्का डहाणू, तलासरी आणि गुजरात राज्यातील उंबरगाव तसेच दादरा नगर हवेली येथील सेलवासा, खानवेळपर्यंत बसला आहे. त्यामध्ये, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली झाली नाही. दरम्यान, डहाणू तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस देखील सुरू आहे. त्यात भूकंपाने जमीन हादरली. या घटनांमुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपची भीती वाटत असली तरी देखील मुसळधार पावसामुळे घराच्या बाहेर झोपता येत नाही. येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊनच जगत असल्याचे दिसत आहे. 2018 मध्ये 10 पेक्षा अधिक भूकंपाचे धक्के पालघरच्या तलासरी तालुक्यामध्ये 11 नोव्हेंबर 2018 पासून 3 रिश्टरपेक्षा 10हून अधिक धक्के बसले होते. यात सर्वात मोठा 1 फेब्रुवारी 2019 मध्ये सर्वात मोठा म्हणजे 4.1 रिश्टरचा धक्का बसला होता. यावेळी पुण्याहून एनडीआरएफचे जवान डहाणू भागात दाखल झाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article