Published on
:
25 Nov 2024, 6:26 am
Updated on
:
25 Nov 2024, 6:26 am
जव्हार : तुळशीराम चौधरी
विक्रमगढ़ विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार हरिवंद भोये (शिक्षक) हे विक्रमगडमधील दादडे पेथील संस्थेच्या अरविंद आश्रमशाळेत मुख्याध्यापक वा पदावर कार्यरत आहेत. मात्र ते गेल्या ३५ वर्षांपासून जवार, मोखाडा, विक्रमगड पा तिन्ही तालुक्यांतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत आणि वसतिगृहात प्रवेश देणे, शिक्षण किती महत्वाचे आहे, ही विद्यार्थी, पालकांन्य शिक्षणासाठी गोडी लावणे व समज देणे, पोलीस स्टेशन पेतील बाद, तंटे मिटवून त्यांना समजावून सांगणे, यामुळेच विक्रमगड विधानसभा मतदार संघात नवनिर्वाचित आमदार हरिशंद्र भोये (शिक्षक) यांना मतदारांनी मताधिक्याने भरभरून मादान करून निवडून दिले.
जव्हार, मोखाडा, विक्रमगड ह्या भागात १४ टक्के आधिवासी लोकवस्ती असलेला मतदार संघ आहे. ह्या भागातील नागरिकांची कुटुंबांची महत्वाची कामे म्हणजे शाळेत, वसतिगृहात प्रवेश देणे, छोटे मोठे वाद संडे मिटकरी, हे विशेष मुद्दे ठरले. तसेच रुते, पाणी, या भागातील मूलभूत समस्या आहेत. ह्या समस्या नवनिर्वाचित आमदार हरिशचंद्र भोये (शिक्षक) यांनी कुठेलेही पद नसतांना सोडविण्याचा प्रयत्न केला गामुळेच त्यांना गोरगरिब मतदारांनी भरभरून मतदान करून निवडून दिल्याचे बोलले जाते.
आदिवासी भागातील कुटुंबाची महत्याची कामे म्हणजे, विविध दाखले, बाद, ठंडे, शाळेत प्रवेश, छोट्या मोठ्या योजना यामुळेच भोये यांची शरशी ठरली आहे. शिक्षक हा प्रामाणिक असतो यामुळेच विक्रमगड विधानसभेतील मतदारांनी ह्या मुख्याध्यापक शिक्षकाला पसंती दिली आहे. तसेच नवनिर्वाचित आमदार भोये यांनी गोरगरिबांना आर्थिक मदत केली, तसेच त्यांनी स्थानिक समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी शालेय शिक्षण, वसतिगृह सेवा आणि सामाजिक कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना लोकांच्या आशीर्वादावर लाभ झाल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांची लोकप्रियता आणि समर्थन मोठ्या प्रमाणात वाढून विधानसभा निवडणुकीत फायदेशीर ठरले.
विक्रमगड विधानसभेतील नवनिर्वाचित आमदार हरिचंद्र भोगे यांनी आदिवासी भागातील लोकांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संबींमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना शाळेतील प्रवेश मिळवून देणे, आणि वसतिगृह सेवांमध्येही त्यांचा सहभाग बाढवला. याशिवाय, विविध दाखले मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले आणि नोकरीच्या संधींबाबत लोकांना माहिती दिली, जेणेकरून त्यांना रोजगाराच्या दिशेने मार्गदर्शन मिळाल, चामुळेच हरिश्चंद्र भोये यांना मतदारांनी मताधिक्याने निवडून दिले आहे.
आमदार हरिश्चंद्र भोये यांना लाडकी बहीण योजना ठरली फलदायी
या योजनांमुळे स्थानिक लोकांना मोठा फायदा झाला आहे. खासकरून लाडक्या बहिणींनी वा योजनांचा लाभ घेत मोठे मतदान करीत लाभ झाला. तसेच शासनाच्या विविध योजनांनी महिलांना सशक्त करण्याचा एक महत्त्वपूर्ण उद्देश ठेवला आहे, अणि या योजनांचा लोकांपर्यंत पोहोचण्याचा कार्य नवनिर्वाचित आमदार भोये यांनी दिले. यामुळे विक्रमगड मतदारसंघात मतदानाचा टका वाढला असून, महिलांच्या सशक्तिकरणासाठी होणारी कामगिरीही लोकांसमोर आली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात त्यांच्या योगदानामुळे आणि स्थानिक समुदायातील विश्वसनीचतेमुळे, हरिचंद्र भोये यांना त्यांच्या निवडणुकीत निर्णायक फायदा झाला असे मानले जाते.