पिपाणी अजूनही मैदानात:निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची मागणी फेटाळली, लोकसभेला बसला होता फटका

3 days ago 3
आगामी विधानसभा निवडणुकी कार्यक्रम करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून केलेल्या मागणीवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले. शरद पवार गटाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी आयोगाने फेटाळली आहे. हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमुळे मोठा गोंधळ झाला होता. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडे गेले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी ही चिन्हे सारखीच दिसत असल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. चिन्हांच्या साम्यामुळे अनेकांनी तुतारीऐवजी पिपाणीचे बटण दाबले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या निवडणूक चिन्हाबाबत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाने दोन विनंती केल्या होत्या. त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली आहे. काय म्हणाले निवडणूक आयोग तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह योग्य नाही. ते मतपत्रिकेवर छोटे दिसते. ते मोठे करण्याची पहिली विनंती केली होती. तसेच तुतारी सारखे दिसणारे दुसरे चिन्ह हटविण्यात यावे, ही दुसरी विनंती केली होती. यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली असून त्याची योग्य दखल घेतली आहे. त्यांना तुतारी चिन्ह कसे दिसले पाहिजे याबाबत आम्ही त्यांना विचारणा केली असता, त्यांनी उत्तर देऊन आकार दिला. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे, असे ते म्हणाले. दुसरे चिन्ह पिपाणी हे सेम नाही. असे आम्ही त्यांना सांगितले आहे, असेही आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी सारख्या दिसणाऱ्या पिपाणी चिन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात पिपाणीने घेतली 37 हजार मते सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे हे उभे होते. त्यांची भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी थेट लढत होती. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा 32 हजार 770 मतांनी पराभव झाला होता. पिपाणी चिन्ह भेटलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 इतकी मते मिळाली. पिपाणीमुळे बजरंग सोनवणेंचा थोडक्यात विजय बीड लोकसभा मतदारसंघातही बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या लढतीत चिन्हाच्या गोंधळामुळे बजरंग सोनावणे यांना खूप मोठा फटका बसला होता. या मतदारसंघातही अशोक थोरात या बहुजन महा पार्टीच्या उमेदवाराला पिपाणी चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे थोरात यांना 54 हजार 850 मते मिळाली. सहा मतदारसंघामध्ये पिपाणी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article