‘पीडीकेव्ही’च्या कुलगुरूंची दत्तक ग्राम मुरादपूर येथे भेट

3 days ago 4
कृषी विद्यापीठ आदर्श गांव योजने अंतर्गत दत्तक मुरादपूर येथे कृषि विज्ञान केंद्र द्वारा आयोजित प्रक्षेत्रफेरी, चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कुलगुरूचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू, कृषी विभागाच्या सहाय्यक सवडतकर यांची उपस्थिती होती. यावेळी कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे प्रगतिशील सदस्य शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मुरादपूर येथे विविध कार्यक्रम उपक्रमाच्या आयोजनाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन हे उपक्रम राबवताना येणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी कसा लाभ घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पं.दे.कृ.वि., यांनी कृषी विज्ञान केंद्रातून घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेऊन विद्यापीठ आदर्श ग्राम या संकल्पनेबाबत चर्चा केली. तर डॉ. नितीन कोष्टी यांनी शेतकऱ्यांसोबत आदर्श ग्राम संकल्पने करिता कृषी विज्ञान केंद्र , इतर विभागांना सहकार्य करावे सर्वांनी या उपक्रमात सहभाग देऊन आदर्श गाव संकल्पना सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. याप्रसंगी मुरादपूर येथील दुर्गम क्षेत्रातील शिवारांना भेटी देण्यासाठी कुलगुरूंनी प्रसंगी ट्रॅक्टर, मोटरसायकलने प्रवास करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article