पुढच्या निवडणुका ताकदीने लढवून जिंकणार:दीपक साळुंखेंनी पराभवानंतर चिंतन बैठकीत व्यक्त केला विश्वास, कार्यकर्त्यांची उपस्थिती

1 hour ago 1
मी सत्तेचा सारीपाट घेऊन जन्माला आलो नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली आणि पराभवाला सुद्धा ताठ मानेने सामोरा गेलो मी माझ्या पूर्वजांची पुण्याई सांगून आणि जाती पातीचे राजकारण करून मते मागितली नाहीत. प्रचंड आर्थिक ताकद आणि घाणेरडे राजकारण याला नाकारून ५१ हजार स्वाभिमानी मतदारांनी स्वतःच्या मताची पैशांत किंमत न करता माझ्यावर विश्वास ठेवला. याच स्वाभिमानी मतदारांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आणि जिंकणार, असा विश्वास माजी आमदार दीपक साळुंखे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (दि. २९) सांगोल्यात शिवसेना ( ठाकरे) पक्षाचे उमेदवार राहिलेल्या दीपक साळुंखे यांनी पराभवाचे चिंतन करण्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीला हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. दीपक साळुंखे म्हणाले, जनतेच्या आग्रहाखातर आणि केलेल्या कामाच्या जोरावर आपण निवडणूक लढवली. झालेला पराभव मान्य करून दुसऱ्या दिवसापासून आपण पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय झालो आहे. प्रत्येक नागरिकाचे जात, पात, पक्ष न पाहता प्रामाणिकपणे काम करत राहीन. दि. ३० ते ३५ वर्षांत कधीच सत्ता मिळावी म्हणून काम केले नाही. ३५ वर्षांतील फक्त ६ वर्षे विधान परिषदेचा आमदार म्हणून सत्ता मिळाली बाकी कधीच सत्तेचा लोभ धरला नाही. या निवडणुकीत मदत करणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदार, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, अभिषेक कांबळे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे आभार मानले. जय-वीरू पुन्हा एकत्र आले पाहिजेत, कार्यकर्त्यांची भावना सांगोला तालुक्याचा सर्वांगीण आणि गतिशील विकास करायचा असेल तर शहाजी पाटील आणि दिपक साळुंखे हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील जय वीरू एकत्र आले पाहिजेत दोघे एकत्र आले तर सांगोला तालुक्याच्या विकासाची बुलेट ट्रेन आणखी वेगाने धावेल म्हणून दोघांनीही झाले गेले विसरून पुन्हा एकदा एकत्र यावे, असे उपस्थित कार्यकर्ते बोलत होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article