पुढच्या पिढीला जगवण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करा:घारेवाडी (कराड) येथील शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांचे प्रतिपादन‎

2 hours ago 1
२०५० मध्ये ५५ अंश सेल्सिअस तापमानात निर्माण होऊ शकतील असे कुठलेच अन्न धान्याचे उत्पन्न घेता येणार नाही, श्वास घ्यायला हवा नसेल, प्यायला पाणी नसेल मग हा परिणाम हा झालाय कशामुळे झालाय, तर झाडांच्या कमतरतेमुळे. आजच्या मुलांना त्यांचे नातू, पणतू प्रश्न विचारतील बाबा आमच्यासाठी तू काय केलं कोणता निसर्ग ठेवला, पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करायचे असेल तर निसर्गाचे संवर्धन करावे कारण पुढच्या पिढीसाठी निसर्ग कारण ती खूप एक अनमोल गोष्ट आहे, असे प्रतिपादन घारेवाडी (कराड) येथील शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवन येथे सर्पराज्ञी वन्यजीवन पुनर्वसन केंद्र, तागडगाव, बालानंद परिवार व पर्यावरण संवर्धन व संरक्षण चळवळीतर्फे ‘आनंदवन महोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने या होत्या. यावेळी तिसगावचे आरएफओ अनिल शेलार, दादासाहेब वाघुलकर, सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे सिद्धार्थ सोनवणे, मांडवेचे सरपंच राजेंद्र लवांडे, सुधीर लवांडे, महेश थोरवे आदी उपस्थित होते. देखमुख म्हणाले, मानव आपल्या स्वार्थासाठी निसर्ग संपवत आहे. मात्र निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. सुवर्णा माने म्हणाल्या,आनंदवनावर संदीप राठोड व त्यांचे कुटुंब, त्यांचे मित्र यांचे निस्वार्थ प्रेम आहे, हे त्यांच्या कार्यातून दिसते. दरम्यान, रात्री ८ वाजता दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांची काव्य संध्या झाली. दुसऱ्या दिवशी दुर्मिळ झाडांच्या बीज संकलनासाठी झटणारे निसर्ग अभ्यासक शिवशंकर चाफुले यांचे व्याख्यान, शेवटच्या सत्रात कवी अरविंद जगताप यांची मुलाखत राकेश पवार यांनी घेतली. प्रास्ताविक संदीप राठोड यांनी, परिचय लहू बोराटे यांनी, सुत्रसंचालन युवराज जगताप यांनी, तर आभार तुकाराम भगत यांनी मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article