राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आता निवडणुकीसाठी प्रचारात उतरणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. कोणताही फेक नरेटिव्ह कोणीही सेट केलेला नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना आहे , असा आरोप त्यांनी केला. धुळ्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, संघावर टीकास्त्र सोडलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता प्रचारासाठी मैदानात उतरणार असून गेल्या निवडणुकीत जो फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला, त्याबद्दल जनजागृती करणार आहे. फेक नरेटिव्हला उत्तर देण्याासाठी संघाने कसून तयारी केल्याचीही माहिती आहे. यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी भाजप, संघावर हल्ला चढवला.
काय म्हणाले संजय राऊत ?
कोणीही कसलाही फेक नरेटिव्ह सेट केलेला नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना आहे. तर आरएसएस खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असेल तर ते कोणतातरी वेगळा, अजून एक फेक नरेटिव्ह सेट करतील. आरएसएस ही एक सांस्कृतिक संघटना आहे, राजकीय नाही असं मी आत्तापर्यंत ऐकत होतो. पण आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत, असं जर त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं असेल तर ते पहावं लागेल, असं ते म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे.