पुणे परिक्षेत्रात १९.१३ काेटींचा मुद्देमाल जप्त:पाेलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती

6 days ago 2
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू असल्याने अवैध व्यवसाय, शस्त्रे, अंमली पदार्थ, दारु, अवैध राेख रक्कम, भेटवस्तू यावर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे परिक्षेत्रात आतापर्यंत निवडणूक काळात १९.१३ काेटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६.६४ काेटी राेख रक्कम, २.८३ काेटी रुपये किमतीचे दारु व रसायन, २२ लाख २४ हजार रुपये किंमतीचा ११३ किलाे गांजा, ७.५७ काेटीचे नऊ किलाे साेने व ६० किलाे चांदी तसेच १.८७ काेटी किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती काेल्हापूर परिक्षेत्राचे पाेलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. फुलारी म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई माेठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. बीएनएसएस कलम १२६ अन्वये परिक्षेत्रात २४ हजार ४७, कलम १२८ अन्वये २४३, कलम १२९ अन्वये १८२४, कलम १७० अन्वये २७, कलम १३५ (३) नुसार ८१३६, एमपीडीए अंर्तगत दाेन, महाराष्ट्र पाेलीस अधिनियम कलम ५५ अन्वये १८, ५६ अन्वये ७९, ५७ अन्वये ७ , महाराष्ट्र संघटीत गुन्हेगरी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये १ याप्रकारे प्रतिबंधक कारवाई करण्यात अाली अाहे. तसेच आतापर्यंत एकूण २३ अवैध पिस्तुल, ३६ काडतुसे जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी दहा दखलपात्र व १५ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काेल्हापूर परिक्षेत्रातील काेल्हापूर, सांगली व साेलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यांचे सीमा कर्नाटक राज्याच्या सीमेशी असून निवडणूक काळात कर्नाटक राज्यातून अवैध तस्करी राेखण्यासाठी तीन जिल्ह्यांत एकूण ३६ सीमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article