पुणे शहरासाठी 1 हजार नव्या ई-बसचा प्रस्ताव:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

3 days ago 3
पुणे शहरात मेट्रोचं जाळं विस्तारत असताना पीएमपीएमएलचं सक्षमीकरण करण्यावर आपला भर असून पीएमपीएमएलसाठी मोदी सरकारच्या माध्यमातून १ हजार नव्या ई-बस मिळाव्यात, या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांना दिला. शिवाय या प्रस्तावासंदर्भात पुणे शहरातील बसेसची आताची संख्या, आवश्यकता आणि भविष्यातील गरज, यासंदर्भात चर्चा केली. यावर मंत्री यांनी आपल्या प्रस्तावावर कार्यवाही आणि प्रक्रिया करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी महिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ साली देशात आल्यापासून पुणे शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हायला सुरुवात झाली. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे मेट्रोची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर वनाज ते रामवाडी आणि पीसीएमसी ते स्वारगेट हे ३३ किलोमीटरचे दोन मार्ग १०० टक्के कार्यान्वित करत हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोच्या कामाचाही शुभारंभ केला. तसेच नुकतेच स्वारगेट-कात्रज या भूमिगत मार्गाचे भूमिपूजन झाले असून खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या दोन टप्प्यांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. एकीकडे मेट्रोचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे पीएमपीएमएलचे सक्षमीकरणही मोदी सरकारच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. याचाच भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर पुणे शहराला मोदी सरकारच्या माध्यमातून ई-बसेस प्राप्त झाल्या. आजवर ४५० हून अधिक ई-बसेस मोदी सरकारच्या माध्यमातून पुणे शहराला मिळाल्या आहेत.मेट्रोचे जाळे भक्कम होत असताना पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या वाढावी आणि पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी सहज, सुलभ आणि वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नव्या १ हजार ई-बसेसचा प्रस्ताव दिला आहे. मला विश्वास आहे, या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही होऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article