पुण्यात गुन्हेगारीत वाढ:बहीणीसोबत प्रेमसंबध असल्याच्या संशयातून तरूणाचा निर्घृण खून

3 days ago 2
बहीणीसोबत असलेल्या अफेअरच्या रागातून आरोपीने साथीदारांच्या मदतीने तरूणाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कौस्तुभ जयदीप नाईक (वय २९ रा. सदाशिव पेठ ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पंकज नांगरे (वय ३१, रा. दांडेकर पूल) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभचे आरोपीच्या बहीणीसोबत अफेअर होते. तुझ्या बहीणीला मी पळवून घेउन जाईल, अशी धमकी त्याने दिली होती. त्याच रागातून आरोपीने साथीदारांना दांडेकर पूल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी कौस्तुभला गाठून त्याला बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यासह काठीने मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर टोळके पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. मोबाईल चार्जर रिटर्न करणे पडले ५ लाखांना अ‍ॅमेझॉनवरून ऑनलाईनरित्या खरेदी केलेला चार्जर कंपनीला माघारी करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी जेष्ठाला ५ लाख ३६ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी प्रकाश कुलकर्णी (वय ७१ ) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी हे सहकारनगर परिसरात राहायला असून, त्यांनी अ‍ॅमेझॉनवरून ऑनलाईनरित्या मोबाइल चार्जर खरेदी केला होता. मात्र, चार्जरमध्ये काहीतरी बिघाड असल्यामुळे त्यांनी पुन्हा कंपनीला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ऑनलाईनरित्या अ‍ॅमेझॉनचा क्रमांक मिळवून संपर्क साधला. मात्र, त्याचवेळी सायबर चोरट्यांनी त्यांना संबंधित कंपनीतूनच बोलत असल्याची बतावणी करीत रिटर्न वस्तूसाठी एक लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या बँक खात्यातून ५ लाख ३६ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल मोरे पुढील तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article