पुण्यात घोरपडे पेठेतील 5 घरांना आग:कपड्याचा साठा भस्मसात, पण कोणतीही जीवितहानी नाही

2 hours ago 1
गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील घोरपडे पेठ, पंचहौद टॉवर परिसरात जोशी वाड्यामध्ये पाच घरे व एका छोट्या दुकानाला भीषण आग लागल्याचा प्रकार घडला. या घटनेत इमारतीच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आलेला कपड्याचा साठा भस्मसात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवत दोन सिलेंडर इमारतीबाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर व सुनिल नाईकनवरे यांनी सांगितले की, गुरुवारी पहाटे 3.47 वाजता घोरपडे पेठ, पंचहौद टॉवर जवळ, जोशी वाडा याठिकाणी काही घरांना आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाकडून एकूण 5 फायरगाडी व 2 वॉटर टँकर (मुख्यालयातून 2 फायरगाडी व 2 वाॅटर टँकर व कसबा, एरंडवणा, गंगाधाम अग्निशमन केंद्र प्रत्येकी 1) घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. जोशी वाडा येथील पाच घरे व एक छोटे दुकान या भीषण आगीत जळाले असून घरामध्ये वरच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात साठा असलेला कपड्याचा माल ही संपूर्ण जळाला आहे. सदर ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांनी चार ही बाजूने पाण्याचा मारा करत आग काही वेळात पूर्ण विझवली आहे. या घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी झालेले नाही. यावेळी घरामधून दोन सिलेंडर देखील बाहेर काढले गेले. संबधित आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article