प्रयागराजमध्ये अडकले नगरचे दीडशे भाविक:वाहतूक कोंडी व पाच किलोमीटपर्यंत अन्नपाण्याची सोय नसल्याने होताहेत हाल
2 hours ago
1
अहिल्यानगर तालुक्यातील जखणगाव येथून प्रयागराज महाकुंभमेळा यात्रेसाठी गेलेल्या दीडशेवर यात्रेकरूंना बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नानाचा मान मिळाला. मात्र, आता ही मंडळी परतीच्या वाटेवर असताना वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने बुधवारपासून प्रयागराजमध्येच अडकले आहेत. त्यांना पिण्याचे पाणी व अन्नही मिळत नसल्याचे जखणगावचे सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी सांगितले. मौनी अमावस्येला जखणगाव येथून गेलेल्या दीडशेवर भाविकांना प्रयागराज त्रिवेणी संगम घाटावर शाहीस्नानाची संधी मिळाली. त्यांचा परतीचा प्रवास सुरू करताना प्रयागराजमध्ये अहिल्यानगरमधील भाविकांची दिंडी अडकली आहे. जवळपास पाच किमी पर्यंत कुठेही पाणी व अन्नाची व्यवस्था नाही. भाविकांची उपासमार सुरू आहे. बुधवारी रात्री १० वाजल्यापासून ते वाहने पार्कींग केलेल्या ठिकाणीच आहेत, असे डॉ. गंधे यांनी सांगितले. आम्हीच ५० जणांच्या स्वयंसेवकांचा गट केला ^ वाहने पार्किंग केलेल्या ठिकाणी तेथील प्रशासनाकडून उपाययोजना व व्यवस्था नाही. कोणीही कशाही गाड्या लावून निघून गेले आहेत. त्यामुळे २० ते २५ हजार वाहने अडकली आहेत. वाहने कढण्यावरून वाद झाल्याने आम्हीच ५० स्वयंसेवकांचा गट केला असून, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. येथे पाच किमीपर्यंत खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध नाही. - डॉ. सुनील गंधे, सरपंच, जखणगाव.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)