प्रवेशबंदीची अधिसूचना केरात, अवजड वाहने शहरात‎:अवजड वाहनांमुळे वाहतूक काेंडी व अपघात, पाेलिसांची फक्त दंडात्मक कारवाई‎

4 days ago 3
आधीच अरुंद रस्ते, त्यालगत वाढती अतिक्रमणे, ठिकठिकाणी सुरु असलेली रस्ता दुरुस्तीची कामे व अवजड वाहनांची बेकायदा रहदारी, यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसुचनेनुसार दिवसा अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी आहे. तरीही हे आदेश झुगारुन अवजड वाहने शहरात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे या वाहनांवर कुठेही कारवाई होताना दिसत नाही. शहरात सकाळी व सायंकाळी ठरावीक वेळेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदारांची मोठी रहदारी असते. अशा वेळी अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्यास मोठी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे तसेच अवजड वाहनांच्या धडकेने आतापर्यंत शहरात झालेल्या अपघातांत अनेक निष्पापांचे बळी गेलेले आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेची आहे. मात्र, या शाखेचे मनुष्यबळ अपुरे आहे. याचा गैरफायदा घेत अवजड वाहने बेकायदेशीररित्या शहरात प्रवेश करतात. 'दिव्य मराठी' ने केलेल्या पाहणीत छत्रपती संभाजीनगर महामार्गावरुन, तसेच कल्याण महामार्गावरून अवजड वाहने बेकायदेशीरपणे शहरात प्रवेश करीत असल्याचे आढळून आले. यात इतर राज्यांतून येणारे कंटेनर, ट्रेलर, तसेच बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या डंपरचाही समावेश होता. मागील आठवड्यात नागरिकांनी या संदर्भात पोलिस अधीक्षक राकेश आेला यांना निवेदन दिले. तारकपूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरु आहे. मनमाडच्या दिशेने क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणारा आयशर टेम्पो आला. पत्रकार चौकातील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरुन तो पोलिस अधीक्षक चौकाच्या दिशेने गेला. यावेळी चौकात एका वाहतूक पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. अहिल्यानगर ते मनमाड महामार्गावरील प्रेमदान चौकात सिग्नल सुरु होता. त्यामुळे वाहतूक नियमन करण्यासाठी एकही वाहतूक पोलिस उपलब्ध नव्हता. मनमाडच्या दिशेने एक मिनी कंटेनर आले. सिग्नल सुटताच ते पुढे मार्गस्थ झाले. त्यामुळे प्रोफेसर कॉलनी चौकाकडून येणारी वाहतूक मात्र खोळंबली होती. . सन २०११ मध्ये जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी सकाळी ९ ते १२, सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली. .सन २०१५ मध्ये जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरात कायमची प्रवेशबंदी केली. या सुधारित अधिसूचनेचे फलक शहराच्या हद्दीजवळ लावले. .सन २०१५ पासून बायपास रस्त्यांना जोडणाऱ्या शेंडी, विळद, कल्याण, केडगाव, अरणगाव, आदी चौकांमध्ये कायमस्वरुपी वाहतूक व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. नेमकी जबाबदारी कोणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेचे उल्लंघन झाल्यास अवजड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी शहराच्या हद्दीत शहर वाहतूक शाखेची आहे. महामार्गावरुन शहरात येणाऱ्या चौकांमध्ये महामार्ग पोलिसांनी दक्ष राहण्याची गरज आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागही शहरात येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करु शकतो. मनमाड महामार्गावर विळद बायपास जवळ, कल्याण महामार्गावर नेप्ती बायपास चौकात व छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बायपासजवळ फलक लावले आहेत. शेंडी चौकाजवळचा सूचनाफलक हिरव्यागार वेलीने झाकला गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना तो फलक दिसतच नाही. छायाचित्रे : उदय जोशी

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article