प्रेमभंगाच्या धक्क्याने मनोरुग्ण झालेली उच्चशिक्षित तरुणी हॉस्पिटलमध्ये:‘लग्न करेल तर त्याच्याशीच, दुसऱ्याशी नाहीच...’

4 days ago 3
तिने एमबीएला प्रवेश घेतला. वर्गातील तरुणाशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी कुटुंबीयांनी स्थळ पाहणे सुरू केले. एकेदिवशी तिने हिंमत करून घरी प्रेमाबाबत सांगितले. तिच्या घरच्यांनी कडाडून विरोध केला, पण तिने घरच्यांचे मन वळवले. मुलाच्या घरच्यांनी मात्र विवाहाला नकार दिला. त्याचा तिला जबर धक्का बसला. त्या धक्क्यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडली. आता तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. तिच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रोहिणीची असह्य अवस्था आत्महत्येचा विचार येतो एकटे राहावे वाटते, झोप येत नाही मोबाइलमध्ये फोटो पाहून रडणे पालकांना ती काय म्हणते रोहिणी (नाव बदलले) अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणी. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली. तिला शिक्षणाची आवड होती. त्यामुळे कुटुंबीयांनी एमबीएसाठी जिल्ह्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. पहिल्या सत्रात तिचे प्रवीणसोबत (नाव बदलले) सूत जुळले. अभ्यासासोबत दोघांचे प्रेम वाढत गेले. दोघांनी मनोमन लग्नाचेही ठरवले. शिक्षण पूर्ण झाले. दोघेही उत्तीर्ण झाले. रोहिणीच्या घरी लग्नाचा विषय सुरू झाला. तिला पाहण्यासाठी पाहुणे येऊ लागले. तिने एक दिवस हिंमत करून प्रेमाबाबत सांगितले. तिच्या घरच्यांनी विरोध केला, परंतु तिने पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘आम्ही दोघेही उच्चशिक्षित आहोत. एमबीए झाले आहे. तो मला खूप आवडतो. दुसऱ्या मुलांशी लग्न करणार नाही,’ असे सांगितले. त्यामुळे रोहिणीच्या कुटुंबाला पर्याय उरला नाही. अखेर तिचे कुटुंबीय तयार झाले. ही आनंदाची बातमी तिने प्रवीणला सांगितली. रोहिणीशी प्रेमविवाह करायचे असल्याचे त्यानेही आई-वडील, बहिणीला सांगितले. घरच्यांनी त्याला नकार दिला. त्याने ही माहिती रोहिणीला सांगितली. त्यामुळे तिला धक्का बसला, पण त्याने तिला थोडे दिवस थांबून घरच्यांना तयार करतो, असे सांगितले. रोहिणीशी लग्न करण्याचा तगादा प्रवीणने आई-वडिलांकडे लावला. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. यामुळे त्याचे आई-वडिलांशी भांडण होऊ लागले, परंतु आपली आणि तिच्या कुटुंबाची तुलना शक्य नाही. त्यामुळे हा प्रेमविवाह होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीणनेही प्रयत्न थांबवून अखेर तिला लग्नासाठी नकार कळवला. त्यामुळे रोहिणीला धक्का बसला. त्यानंतर प्रवीणने तिच्याशी बोलणेही बंद केले. त्याचा तिच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article