फिट है तो हिट है… खिलाडी अक्षय कुमारच्या फिटनेसचा फंडा माहीत आहे काय?

2 hours ago 1

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा एक मेहनती अभिनेता आहे. अत्यंत परिश्रम करणारा, वेळ आणि फिटनेसबाबत अलर्ट असलेला अभिनेता म्हणूनही त्याच्या ख्याती आहे. अक्षय कुमारची सकाळ पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होते. फिटनेसला महत्त्व देणारा अक्षय कुमार, बॉलिवूडच्या सर्वात फिट स्टार्सपैकी एक आहेत. अक्षय कुमारचं फिटनेस आणि आरोग्याबद्दल असलेलं सजग असणं हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु वयाच्या दृष्टीने तो पन्नाशीच्या पुढे असला तरीही, तो अजूनही तरुण आणि फिट दिसतो. त्याच्या फिटनेसच्या मागील रहस्याबद्दल आपल्याला माहिती आहे का?

अक्षय कुमार त्याच्या सोशल मीडियावर फिटनेस संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. तो आपल्या दैनंदिन दिनचर्येची माहितीही कधी कधी शेअर करतो. अलिकडेच त्याने फिटनेस संदर्भातील एक ट्विट केलं. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मेटाबोलिक सिंड्रोमवर भाषण शेअर केलं आणि ट्विटरवर शेअर करताना लिहिलं की, “मेटाबोलिक सिंड्रोमशी लढण्यासाठी योग्य झोप, शुद्ध हवा, सूर्यप्रकाश, प्रक्रिया केलेला आहार टाकणं, कमी तेल आणि घरगुती तूप असलेला आहार आवश्यक आहे.”

नियमित व्यायाम…

अक्षय कुमारने योग्य प्रकारे वर्कआउट करण्याचंही सूचवलंय. “नियमित व्यायाम आपल्या जीवनाला बदलू शकतो,” असं त्याने म्हटलं आहे. त्याच्या शेअर केलेल्या व्हिडिओत पंतप्रधान मोदींनी मेटाबोलिक सिंड्रोमच्या वाढत्या समस्येवर चिंता व्यक्त केली असून व्यायाम आणि आरोग्यदायी आहार घेण्याचं महत्त्व सांगितलं.

कसं आहे रुटीन

अक्षय कुमारने एका मुलाखतीत त्याच्या दिवसाच्या रुटीनची माहिती दिली होती. तो प्रत्येक दिवसात सुमारे अर्धा तास ध्यान करतो आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी 4 ते 5 लिटर पाणी पितो. प्रोटीन शेकऐवजी, तो संतुलित आणि आरोग्यदायी आहार घेतो. त्याने खाण्याचा वेळसुद्धा महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं आणि रात्री झोपण्याच्या 4 तास आधीच जेवण घेतो.

काय कराल?

आरोग्यदायी आणि फिट राहण्यासाठी दररोज चालणं, धावणं किंवा कोणताही व्यायाम करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संतुलित आहार, ज्यामध्ये प्रोटीन, कर्बोदके, चरबी, आवश्यक जीवनसत्त्वे, खनिज आणि पाणी योग्य प्रमाणात असावं, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. असे संतुलित आहारामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर योग्य प्रकारे कार्य करू शकते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article