बँक मॅनेजरने परस्पर ग्राहकाचे लॉकर उघडून २.६५ कोटी केले लंपास:सोन्याचे दागिने वितळवल्याने सराफावरही गुन्हा दाखल

2 hours ago 1
पुण्यातील कॅम्प परिसरातील अरोरा टॉवर्स याठिकाणी पंजाब नॅशनल बँकेतील व्यवस्थापक महिला अधिकाऱ्याने एका ग्राहकाचे लॉकर परस्पर उघडून त्यातून 2.65 कोटी रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे व हिऱ्यांचे मौल्यवान दागिने व रोख साडेनऊ लाख रुपये व इतर महत्वाची कागदपत्रे लंपास केली. तसेच सोन्याचे दागिने सराफास देऊन त्याने सोन्याचे दागिने वितळवून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक व सराफ याच्यांवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात यश केशवलाल कपूर (वय-47, रा.सोपानबाग, पुणे) यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापक नयना अजवानी व सुरेंदर शहानी तसेच ज्वेलर सतीश पंजाबी व त्यांचे इतर अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन ते चार वेळा प्रयत्न करून उघडले लॉकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मागील दोन महिन्यांपूर्वी बँकेतील लॉकर त्यांनी उघडून तपासले असता त्यातील सर्व सोन्या-चांदीचे दागिने व हिऱ्याचे दागिने, रोख रक्कम हे सुस्थितीत होते. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी ते कॅम्प मधील पंजाब नॅशनल बँकेत गेल्यावर त्यांना समजले की, 13 ऑगस्ट रोजी बँकेचे व्यवस्थापक आरोपी यांनी व इतर अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून कोणतीही परवानगी न घेता त्यांचे लॉकर हे सुरेंदर शहानी यांच्या मार्फतीने तीन ते चार वेळा प्रयत्न करुन उघडले. त्यातील दागिने, रोख रक्कम, हिरे असा एकूण 2.65 कोटी रुपये किंमतीचा मौल्यवान ऐवज व इतर महत्वाची कागदपत्रे बँकेच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता, स्वत:हून काढून घेतली. पुरावा नष्ट करण्यासाठी दागिने वितळवले ज्वेलर सतिश पंजाबी यास दागिने दिले गेले व त्याने कोणतीही शाहनिशा न करता सदर सर्व दागिने पुरावा नष्ट करण्यासाठी वितळून टाकले आहे. याबाबत पुढील तपास लष्कर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे करत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article