बंगळूर-बेळगाव विमानसेवा 27 पासून बंद Pudhari Photo
Published on
:
12 Oct 2024, 1:54 am
Updated on
:
12 Oct 2024, 1:54 am
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
सांबरा विमानतळावरील टर्मिनल 2 चे बांधकाम सुरू असून त्याच्या विस्तारासाठी अतिरिक्त 56 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने दि. 27 ऑक्टोबरपासून बंगळूर ते बेळगाव मार्गावरील सकाळची थेट उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान प्रवास करणार्या प्रवाशांना आता बस किंवा रेल्वेचा पर्यायी वाहतूक म्हणून विचार करावा लागणार आहे.
इंडिगोच्या बंगळूर -बेळगाव दरम्यानच्या सकाळच्या विमानसेवेने गेल्या वर्षभरात 85 टक्के प्रवासी वाहतूक करून सातत्याने चांगली कामगिरी केली होती. सदर सेवा सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनंतर आता ही सेवा अचानक रद्द केल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार इंडिगोने हिवाळ्यातील वेळापत्रकाचा भाग म्हणून या मार्गाचे बुकिंगही थांबवले आहे. स्टार एअरने यापूर्वीच जोधपूर, सुरत, इंदूर आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी उड्डाणे रद्द केल्यामुळे बेळगाव विमानतळावरील प्रवासी वाहतुकीत घट झाली आहे.