बटेंगे - कटेंगे’ची भाषा, संविधानाशी प्रतारणा:काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा आरोप; सत्ताधाऱ्यांना जबाबदारीचे भान राखण्याचा सल्ला
2 hours ago
1
‘घटनात्मक पदांवरील’ सत्ताधाऱ्यांनी सत्तारूढ होतांना घेतलेली शपथ ही औपचारिकता नसून, घटनात्मक प्रजासत्ताक भारताच्या जनतेप्रती घटनात्मक बांधिलकी आहे याचे भान सत्ताधारी नेत्यांनी ठेवण्याची गरज असल्याची टीका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे. गोपाळ तिवारी पुढे म्हणाले की, निवडणूक काळात सरकारने जनतेप्रती केलेल्या कामाचा लेखाखा देण्याऐवजी ‘धर्म - जाती’च्या नावे ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणे हे संविधान विरोधी कृत्य आहे. पण निवडणूक आयोग यासंबंधी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ‘भारतीय संविधान दिना’च्या औचित्याने राजीव गांधी स्मारक समिती, कात्रज, पुणेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गोपाळ तिवारी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्यातील निवडणुकीत ‘लोकशाही राज्य व्यवस्थेच्या’ कार्याच्या लेखा-जोख्यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र घटनात्मक पदांवरील नेत्यांनी जाती-धर्माचे राजकारण करून मतांचे ध्रुवीकरण करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. हा अविवेकी प्रकार आहे. 140 कोटींच्या देशात अल्पसंख्याक भारतीय मुस्लिम 18 कोटींच्या घरात आहेत. त्यानंतरही सत्ताधारी भाजपकडून त्यांच्यावर होणारी आगपाखड हास्यास्पद आहे. सामाजिक सुरक्षा राखण्यात भाजप सरकार अपयशी ठरत असल्याची ही पावती आहे. स्वातंत्र्यसंग्रामात सर्व-धर्मीयांचे योगदान असताना, संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष व समाजवाद’ शब्द काढण्याबाबतचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने संविधान दिनाच्या पूर्व संध्येला देऊन भारतीय संविधानाची व्याख्या ही स्वातंत्र्य, समता, बंधुता व समानता भिमुख असल्याचे सुस्पष्ट केले. ही समाधानकराक बाब असल्याचे तिवारी यांनी यावेळी सांगितले. भारतीय नागरिकाने संविधानाची तत्वे अंगिकारले तरच आम्ही भारतीय नागरिक असे आपण म्हणू शकतो, असे विधान पश्चिम महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा सचिन दुर्गाडे यांनी यावेळी केले. संविधानातील मतदानाचा हक्क ईव्हीएम च्या वावटळीत हरवला काय असे वाटायला लागले असल्याचे ॲड संतोष जाधव यांनी सांगितले. भारतीय संविधानाचे वाचन, प्रचार व जागरुकता ही प्रत्येक भारतीयाने अंगीकृत करणे ही काळाची गरज असल्याचे ॲड संदिप ताम्हणकर यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)