बलवाडी-निंभोरा रेल्वे बोगद्याजवळील अडचणीचे डबल गतिरोधक अखेर काढले:संभाव्य अपघातातून वाहनधारकांची सुटका
3 hours ago
1
नव्याने करण्यात आलेल्या बलवाडी निंभोरा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याजवळ चार गतिरोधक बसवण्यात आले, त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत होते. या समस्येबाबत दिव्य मराठी २२ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले, त्याची दखल घेत संबंधित विभागाकडून वाहनधारकांना अडचणीचे ठरणारे हे गतिरोधक जेसीबीच्या मदतीने काढण्यात आले. दोन्ही बाजूला गतिरोधक बसवले, त्यांच्या काही फुटावर दुसरे गतिरोधकही बसवल्याने वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. शिवाय गतिरोधकाच्या ठिकाणी पांढरे पट्टेही टाकले नसल्याने नागरिकांना गतिरोधक समजत नव्हते. एक झाल्यावर उतारावर दुसरा गतिरोधक असल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत होते. गतिरोधकाला काही मोठी वाहने खालून टेकत होती. तर दुचाकी धडकून अपघातही घडत होते. परिणामी त्यांची उंची कमी करण्याची किंवा दोन्ही बाजूचे एक-एक गतिरोधक काढून टाकण्याची मागणी होती.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)