बांगलादेश हायकोर्टाचा इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार, चिन्मय दास यांच्या अटकेमुळे वाद

2 hours ago 2

बांगलादेशमध्ये सतत हिंदूंवरील अत्याचार वाढत आहेत. या विरोधात आवाज उठवणाऱ्या इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास (Chinmay krishna Das) यांना बांगलादेशमध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर बांगलादेशच्या उच्च न्यायालयात इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाने याला स्पष्ट नकार दिला आहे. इस्कॉनच्या कारवायांवर बंदी घालणारा आदेश देणार नसल्याचं कोर्टाने म्हटलंय. सुप्रीम कोर्टाचे वकील मोहम्मद मोईनुद्दीन यांनी कोर्टात इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना विषयी वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे अहवाल सादर केले. या अहवालात इस्कॉनशी संबंधित लोकांनी हिंसा भडकावल्याचा आणि चितगावमधील वकील सैफुल इस्लामच्या हत्येचा आरोप केला होता. या आधारावर मैनुद्दीन यांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केसी होती.

बांगलादेशचे वृत्तपत्र द डेली स्टारच्या मते, या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, इस्कॉन हा जातीय हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन देत आहे, परंपरागत हिंदू समुदायांवर आपली श्रद्धा लादत आहे आणि मागासलेल्या हिंदू जातींच्या सदस्यांना जबरदस्तीने भरती करत आहे. गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा ॲटर्नी जनरल यांच्या कार्यालयाने न्यायमूर्ती फराह मेहबूब आणि देबाशीष रॉय चौधरी यांच्या खंडपीठाला सांगितले की, सरकार या संदर्भात आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. न्यायालयाने सरकारला लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यास सांगितले आहे.

बांगलादेशात वाद काय?

हिंदू समाजातील प्रमुख व्यक्ती आणि इस्कॉन मंदिराशी संबंधित चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्याने संपूर्ण बागंलादेशात तणावाचे वातावरण आहे. दास यांना अटक केल्याने हिंसाचार उसळला. चितगावमध्ये सैफुल इस्लाम या वकीलाला आपला जीव गमवावा लागला. या हिंसाचारानंतरच इस्कॉनवर बंदी घालण्याची याचिक दाखल करण्यात आली.

बांगलादेशात दास यांच्या अटकेनंतर निदर्शनं वाढली. दास यांच्या समर्थकांनी हिंसाचार केल्याच्या बातम्या आल्या. अल्पसंख्याक हिंदूंवरही हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या. बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले झाले.

ISCON म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतनेची सुरुवात स्वामी प्रभुपादांनी यांनी जुलै 1966 मध्ये केली होती. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात याची सुरुवात झाली. त्यानंतर ती जगात पसरली. आज हजाराहून अधिक मंदिरे जगभरात आहेत. एकट्या भारतात इस्कॉनची 400 केंद्रे आहेत. याशिवाय पाकिस्तान, बांगलादेश, आखाती देश आणि इतर आशियाई देशांमध्येही मंदिरे बांधली गेली आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article