बाजाराने कूस बदलली, अखेरच्या दिवशी धुवांधार तेजी!File Photo
Published on
:
25 Nov 2024, 9:04 am
Updated on
:
25 Nov 2024, 9:04 am
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.
अगोदरच मतदानाच्या दिवशी सुटीमुळे सप्ताहात बाजारात चारच दिवस सुरू होता. त्यात आणखी गुरुवारी सकाळीच अदानी न्यूजने वातावरण खराब करून ठेवले होते. वास्तविक CLSA रिपोर्टने बाजाराची खालची दिशा बदलेल काय? असे मागील सोमवारच्या लेखाचे शीर्षक होते आणि सोमवारी बाजारात दुपारपर्यंत रिकव्हरीची चिन्हेची दिसत होती. परंतु शेवटच्या अर्ध्या तासात रशिया युक्रेन युद्धाबाबत एक बातमी आली आणि बाजार कोसळला.
सोलार प लार पॉवर कॉंट्रॅक्टस् मिळविण्यासाठी अदानी ग्रुप भारतातील पाच राज्यांना २२०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आणि ह्या मागनि अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करून गौतम, अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी ह्यांच्या अटकेचे वॉरंट अमेरिकेत निघाल्याच्या बातमीने बाजारात मोठाच हाहाकार माजला. विशेषतः अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये भूकंप झाला. अदानी ग्रुप शेअर्सचे एकत्रित बाजार भांडवल १४ लाख ३१ हजार कोटींवरून १२ लाख १० हजार कोटींवर आले. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाला बसलेला हा दुसरा धक्का !
परंतु ह्याच्याच जोडीने गुरुवारी रात्री गोल्डमन सॅकस्ने भारतीय बाजाराविषयी नजिकच्या तीन महिन्यांचे आणि बारा महिन्यांचे टारगेट जाहीर केले आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतीय बाजारात तेजीची अशी काही बरसात झाली.
गोल्डमन सॅकसने तीन महिन्यांसाठी निफ्टीने जे २४००० चे टारगेट दिले होते. ते शुक्रवारीच गाठले जाते की काय असे वाटले. ५५७ पाईंटस्नी वाढून निफ्टी २३९०७.२५ वर बंद झाला आणि दिवसभरातील त्याचा उच्चांक होता. २३९५६.१०! सेन्सेक्समध्ये जवळपास २००० तर ७६२ पॉईंटस्ची तेजी ! एक एनर्जी इंडेक्स वगळता सर्व सेक्टरल इंडायसेस तेजीत होते. विशेषतः रिअॅल्टी, ऑटो, आयटी, एफएमसीजी हे निर्देशांक तेजीमध्ये आघाडीवर होते. पूर्वीचे Raymond आणि Raymond Realt असे विभाजन झालेल्या रेमंडला NSE आणि BSE कडून No objec- tion Certificate मिळाले आणि हा शेअर शुक्रवारी २० टक्के उसळला (CMP Rs. 1664.15) रेमंडच्या भागधारकांना रेमंड रिअॅल्टीचे शेअर्स एकास एक ह्या प्रमाणात मिळतील. हा शेअर अगदी अल्पावधीत रु. २००० पर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको. अर्थातच ही खरेदीची शिफारस नाही.
वाचकांनी स्वतः अधिक अभ्यास करावा
प्राज इंडस्ट्रीज हा दुसरा शेअर जो शुक्रवारी २० टक्के वाढला. अंतिम बंद भाव रु. ७८८/- कंपनीने २०३० पर्यंत बायोपॉलीमर्स, सस्टेनेबल, अॅव्हिएशन फ्युएल आणि एनर्जी ट्रांझिशन ह्या सेक्टर्समध्ये तिप्पट उत्पन्न वाढविण्याचा इरादा जाहीर केल्याचा हा परिणाम हाही शेअर रु. १००० कडे वेगाने घोडदौड करत आहे.
अदानी ग्रुपवर पडलेल्या बाँबगोळ्यामुळे अदानी शेअर्सबरोबरच LIC, SBI, Bank of Baroda, PNB Rec हे शेअर्ससुद्धा नकारात्मकरित्या चर्चेत आले. त्याचे कार ULIC ने अदानींच्या सात कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यामध्ये १२००० कोटी रुपयांचा तोटा दिसत आहे. शिवाय ग्रुपला विविध बँका आणि नॉनबैंकिंग फायनान्स कंपन्यांनी
रु. दोन लाख कोटींपेक्षा अधिक कर्ज दिले आहे. त्यामध्ये वर उल्लेखलेल्या बँकांची भागीदारी खालीलप्रमाणे
State Bank of India - Rs.
27000 Cr. Bank of Barado - Rs. 5380 Cr.
Punjab National Bank - Rs. 7000 Cr.
Rural Electrification Corpora- tion Rs. 7000 Cr.
मागील आठवड्यात सेबीने Futures & aptions Trading चे बदललेले नियम बाजारात लागू झाले.
त्यानुसार निफ्टी आणि इतर इंडायसेसचे लॉट साईझ प्रचंड वाढवण्यात आले. आता ह्या बदललेल्या लॉट साइझनुसार ट्रेडर्सना प्रिमियमची रक्कम सुद्धा मोठी द्यावी लागेल.
गोल्डमन सॅकसने येत्या एक वर्षासाठी निफ्टीचे टारगेट २७००० ठेवले आहे हे आपण पाहिले. तसेच त्यांनी खालील चार माप दंडांवर आधारित १६ दर्जेदार शेअर्सची यादी जाहीर केली आहे जे येत्या एक वर्षात खूप चांगला परतावा देऊ शकतील.
1) Strong Balance Sheets
2) High Earnings Visibility
3) Positive EPS revisions
4) Low beta Stocks
वरील मापदंडाना अनुसरून गोल्डमन सॅकस्ने शिफारस केलेले शेअर्स खालीलप्रमाणे :
Administrator