बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सावध:शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्याचा आग्रह

2 hours ago 1
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सावध झाली असून राज्यातील आढावा घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी यापूर्वीही शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली होती, पण तेव्हा शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व येथे रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली होती. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. विधानसभा निवडणुकांच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे केंद्रीय यंत्रणा सज्ज झाल्या असून त्यांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतला आहे. शरद पवारांना धोका काय? या दरम्यान, केंद्रीय यंत्रणांकडून खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घेण्याबाबत विनंती केली आहे. मात्र, शरद पवारांना धोका काय आहे? याबाबत कोणतही माहिती समोर आली नाही. फक्त शरद पवारांनाच या धोक्याबाबत माहिती देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे झेड प्लस सुरक्षाबाबत शरद पवार काय निर्णय घेतात, हे पहावे लागणार आहे. याआधी शरद पवारांनी नाकारली झेड प्लस सुरक्षा केंद्र सरकारने याआधी देखील झेड प्लस सुरक्षा दिली होती. मात्र, शरद पवार यांनी या सुरक्षेबाबत संशय व्यक्त करत ती सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. झेड प्लस सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असे शरद पवार त्यावेळी म्हणाले होते. हेही वाचा... NCP चा इतिहास : सोनियांच्या परदेशी वंशावर बोट अन् राष्ट्रवादीची स्थापना:पहिल्याच निवडणुकीत पक्षाला सत्तेच्या खुर्चीत बसवले, शरद पवारांच्या 'पॉवर'बाज खेळी शरद पवार हे नाव देशाला काही नवे नाही. शरद पवारांचे मोठे बंधू हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. त्यांच्यासोबत न जाता पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या काम करायला सुरूवात केली. पाच दशकांहून अधिक काळाचा शरद पवारांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे. पूर्ण इतिहास वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article