बार्शीच्या महाराष्ट्र विद्यालयाला पुणे विभागात तृतीय पारितोषिक:मुख्यमंत्री माझी शाळेअंतर्गत 11 लाखांचे बक्षीस‎

2 days ago 2
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयाने पुणे विभागात तृतीय क्रमांक पटकावला. यासह शाळा तृतीय क्रमांकासाठी असलेल्या ११ लाख रुपयांचे परितोषिक पटकावले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात विजेत्यांचा शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, संस्था उपाध्यक्ष नंदन जगदाळे आदी उपस्थित होते. हे अभियान दि.५ ऑगस्ट ते दि. ६ सप्टेंबर २०२४ या कालावधी दरम्यान शाळांत राबवण्यात आले होते. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, संस्थेचे सचिव पी.टी.पाटील यांनी अभिनंदन केले. पायाभूत सुविधा, धोरणांची अंमलबजावणीवर गुणांकन दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येयधोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारित एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article