बार्शीत 25 वृत्तपत्र विक्रेत्यांची नेत्रतपासणी:दिव्य मराठीचा वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त उपक्रम, दोघांची होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

8 hours ago 1
वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून दैनिक दिव्य मराठीच्या वतीने बार्शीतील शंभूराजे हॉल येथे वृत्तपत्र विक्रेते बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २० ते २५ जणांची यात मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ विजय कसबे दिव्य मराठीचे युनिट हेड नौशाद शेख, जाहिरात विभागातील सहायक व्यवस्थापक गिरीश कुलकर्णी, वितरण व्यवस्थापक महेश जम्मा, दिव्य मराठीचे बार्शीचे वितरक सोमेश्वर देशमाने, सादिक शेख यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र म रा वृ वि संघटनेचे सचिव शाम थोरात, राज्य संघटनेचे सदस्य गोरख भिलारे, संघटनेचे जिल्हा सचिव बंटी बाबर, तालुका उपाध्यक्ष ताहेरअली काझी, तालुका सचिव सचिन शेटे आदी उपस्थित होते. या शिबिरातील तपासणीत सुमारे २० जणांना चष्मा वापरणे गरजेचे असल्याचे तसेच दोघांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. एच व्ही देसाई आय हॉस्पिटल (हडपसर पुणे) मधील डॉ विजय कसबे यांनी नेत्र तपासणी केली. मोतीबिंदू आढळलेल्या दोघांना एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे ऑपरेशनसाठी रेफर केले आहे. तेथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया होईल तसेच चष्म्याचा अचूक नंबर काढून त्यांना अल्पदरात चष्माची सोय होईल असे डॉ कसबे यांनी सांगितले. दै. दिव्य मराठी ने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल वृत्तपत्र विक्रेते बांधवांनी आभार मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article