बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक:आरोपीला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

6 days ago 3
बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलिसांकडून पुणे गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी संबधित आरोपीला शुक्रवारी पहाटे येवलेवाडी परिसरातून अटक केली आहे. त्यानंतर त्याला शनिवारी दुपारी शिवाजीगर येथील पुणे न्यायालयात हजर केले. यावेळी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, अटक आरोपींच्या दोन साथीदारांना अटक करायची आहे. अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असून त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे. आरोपींनी लूटमार करण्यासाठी वापरलेले हत्यार, वाहन जप्त करायचे आहे. आरोपींनी पीडितेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली असून, ती हस्तगत करायची आहे. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून, अन्य दोन आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहे. पुणे पोलिसांची एकूण ६० पथके या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाली होती. यामध्ये सुमारे 700 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सात दिवस आरोपींचा माग काढत होते. ४५० ते ५०० संशयतांची पोलिसांनी चौकशी केली होती तसेच 50 हजार मोबाईल डाटाचे स्कॅनिंग देखील करण्यात आले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article