बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात अख्तर शेखच मास्टरमाइंड:दरवेळी नवा साथीदाराला घेऊन करत होता गुन्हे, पोलिस तपासात निष्पन्न

2 days ago 2
लुटमार करण्याच्या उद्देशाने बोपदेव घाटात तरूण-तरूणीला अडवून त्यांना मारहाण करीत मुलीवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी सराईत अख्तर खान हाच मास्टरमाईंड असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरूद्ध विविध पोलीस ठाण्यातंर्गत दरोडा व पोक्सोअंतर्गत तब्बल १० गुन्हे दाखल आहेत. गुन्हा करताना दरवेळी नवीन साथीदारांची निवड करण्याची त्याची मोडस ऑपरेंडी होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. यापूर्वी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) याला अटक केली आहे. त्यांच्या एका साथीदाराचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक अत्याचारातील आरोपी अख्तर सराईत असून, त्याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी दरवेळी गुन्हा करताना नवीन साथीदाराची मदत घेण्याची त्याची पद्धत होती. अशाच पद्धतीने त्याने पुणे जिल्ह्यातील भिगवण परिसरात मुलीवर अत्याचार करून लुटल्याप्रकरणी २०१९ मध्ये गुन्हा दाखल आहे. त्यासोबतच त्याने राज्यातील विविध भागात दरोडा, पोस्को, विनयभंगाचे गुन्हे केले आहेत. बोपदेव घाटातही त्याने आरोपी रवींद्रकुमार कनोजिया याच्यासह आणखी एकाला सोबत घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article