भरधाव कार उलटल्यामुळे ‎दाेन ठार, दाेन जण जखमी:पाराेळा-धुळे रस्त्यावरील अपघात,मृत दाेघेही धुळ्याचे‎

3 hours ago 1
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील‎विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे‎जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा‎सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे‎पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळी‎उलटली. त्यात कारमधील दाेघांचा मृत्यू‎झाला. तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही‎घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता‎घडली.राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८)‎व नीलेश सुरेश पाटील (वय २३) रा.‎तरवाडे जि. धुळे असे मृतांची नावे अाहेत.‎ पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणारी‎स्विफ्ट कारमध्ये नीलेश पाटील, गोविंद‎भास्कर राडोड (वय २४) रा. तरवाडे ,‎राहुल अहिरे हे तिघे व महेश आत्माराम‎पाटील (वय २१) रा. मोंढाळे प्र. अ. ता.‎पारोळा हे धुळ्याकडे भरधाव वेगाने जात‎हाेते. तेव्हा पारोळा शहरानजीक असलेल्या‎विचखेडा गावाच्या अलीकडे कार वरील‎चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार‎रोडच्या कडेला चार वेळा उलटून पाचशे‎फुटांवर थांबली. त्यात राहुल पाटील याचा‎जागीच मृत्यू झाला. तर नीलेश पाटील‎याला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना‎रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. महेश देवरे व‎गोविंदा वंजारी हे गंभीररीत्या जखमी झाले.‎त्यांना १०८ रुग्णवाहिका व महामार्गाची‎१०३३ व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत‎रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात‎दाखल करण्यात आले. यातील गोविंदा‎राठाेड यांनाही धुळे येथे हलवण्यात आले‎आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल‎करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती‎देण्यात आली.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article