भरारी पथकाद्वारे 100 मिनिटात कारवाई- अपार:एकूण 3 लाख 9 हजार 814 मतदारांची संख्या

2 days ago 2
निवडणूक विभागाद्वारे ईएसएमएस ॲपवरून तक्रार आल्यास शंभर मिनिटात त्यावर भरारी पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. मूर्तिजापूर राखीव विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता विषयक तक्रारीबाबत सामान्य नागरिक सी-व्हीजील १९५० हा हेल्प सेंटर क्रमांकावर देखील तक्रार करू शकतात. या मतदारसंघात मूर्तिजापूर तालुका, बार्शीटाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील कुरणखेड मंडळ व बोरगाव मंजू मंडळातील काही गावांचा समावेश आहे, अशी माहिती मंगळवारी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार आपार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदार संघात एकूण ३९० मतदान केंद्रांची संख्या असून मूर्तिजापूर ग्रामीणमध्ये १५२, बार्शीटाकळी ग्रामीणमध्ये १३६, अकोला ग्रामीणमध्ये ३७ मतदार केंद्रांचा समावेश आहे. तर मूर्तिजापूर शहर ४४, बार्शीटाकळी शहर २१ असे मतदान केंद्र असून यामध्ये २५६ मतदारसंघ हे लोकेशनवर राहणार आहेत. मतदार संघातील पुरुष मतदारांची एकूण संख्या १ लाख ५८ हजार ६३६ असून महिला मतदारांची संख्या १ लाख ५१ हजार १७३ आणि इतर ५ मतदार आहेत. नामनिर्देशन पत्र येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. या निवडणुकीकरिता मूर्तिजापूर येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांची मलकापूर येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी तहसीलदार विजय सवडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बार्शीटाकळीचे तहसीलदार राजेश राजवजिरे तसेच गटविकास अधिकारी अशोक बांगर हे राहणार आहेत. पत्रकार परिषदेला बार्शीटाकळी येथील तहसीलदार राजेश राजवजिरे तसेच निवासी तहसीलदार राऊत व नायब तहसीलदार महेश नागोलकर यांची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article