भाजप तोतया पार्टी अन् तो IPS ही तोतया:नाना पटोलेंनी फेटाळले बिटकॉईनचे आरोप; म्हणाले - गुन्हा दाखल, मानहाणीचा दावाही ठोकणार

1 day ago 1
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीत बिटकॉईनच्या वापराविषयी भाजपने केलेला आरोप जोरकसपणे फेटाळून लावला आहे. भाजपने रवींद्र पाटील नामक जो आयपीएस अधिकारी उभा केला आहे, तो मुळात आयपीएसच नाही. तो एक तोतया आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला हे बिटकॉईन प्रकरण समजत नाही. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मानहाणीची नोटीसही बजावण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांच्या आरोपाने खळबळ उडाली. रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन व बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला. भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री एका पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप केला. तसेच यासंबंधीचे कॉल रेकॉर्डिंग व व्हॉट्सएप चॅट्सचे स्क्रीनशॉटही दाखवले. भाजपच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असताना स्वतः नाना पटोले यांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. तोतया पार्टी अन् तोतया पोलिस अधिकारी नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, भाजपने रवींद्र पाटील नामक जो आयपीएस अधिकारी आणला आहे तो मुळात आयपीएसच नाही. भाजप स्वतःच एक तोतया पार्टी आहे. हा पक्ष आता एक खोटारडा व जुमले पार्टी बनला आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एका तोतया अधिकाऱ्याला आणून असे घाणेरडे कृत्य करणे हे भाजपला शोभत नाही. हा अधिकारी स्वतः तुरुंगात होता. त्यांनी जो कथित ऑडिओ व्हायरल केला आहे, त्यात माझा आवाज नाही. मी एक शेतकरी माणूस आहे. बीटकॉईनचा कोणताही प्रकार मला माहिती नाही. माझा कधी त्याच्याशी संबंधही आला नाही. मी याविषयी कायदेशीर नोटीस बजावली आहे. काल एफआयआरही दाखल केला आहे. त्यांच्यावर मानहाणीचा दावाही दाखल केला जाईल. सुधांशु त्रिवेदी असो किंवा रवींद्र पाटील असो त्यांनाही मानहाणीची नोटीस बजावली जाईल. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाजच नाही नाना पटोले पुढे म्हणाले, या प्रकरणी वस्तुस्थिती लोकांपुढे आली पाहिजे. अशा प्रकारे कुणाचीही बदनामी करण्याची भाजपला सवय लागली आहे. माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाची हे लोक या पातळीवर जाऊन बदनामी करत असतील तर सर्वसामान्यांचे काय? ही खोटे बोलणारी पार्टी आहे. आता त्यांचा त्याच पातळीवर सामना केला जाईल. मी माझ्या आयुष्यात बिटकॉईन पाहिले नाही. हा विषय मला केव्हाच समजला नाही. ती माझी लाईनही नाही. काल रात्री मी ती ऑडिओ क्लिप ऐकली. त्यात माझा आवाजच नाही. माझा आवाज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ओळखू येतो. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात आमचे सरकारही येत आहे. त्यानंतर आम्ही त्याची सखोल चौकशी करू, असे नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले. हे ही वाचा... माझ्याकडे 1 पैसाही सापडला नाही:नालासोपारा येथील घटनेमागे भाजपचा कोणताही नेता नाही, तावडेंनी फेटाळला विरोधकांचा आरोप मुंबई - भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी नालासोपारा येथे घडलेल्या घटनेमागे कोणतेही कट कारस्थान नसल्याचा दावा केला आहे. काल मी नालासोपारा येथे जाणार असल्याची माहिती भाजपच्या कोणत्याही नेत्याला नव्हती. मी अचानक तिथे गेलो होतो. त्यामुळे त्या घटनेमागे काही कारस्थान असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article