भाजप धर्माच्या आधारावर जनतेचे लक्ष विचलित करते:मोदींच्या राज्यात केवळ अदाणी सेफ, प्रियांका गांधींचा गडचिरोलीतून घणाघात
2 hours ago
1
सरकार जनतेला उत्तरदायी असते, पण भाजपने मागील 10 वर्षांपासून ही परंपरा मोडीत काढली आहे. एक है तो सेफ है च्या घोषणा दिल्या जातात, पण मोदींच्या राज्यात केवळ अदाणी हेच सेफ आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली. अडीच वर्षांत लाडकी बहीण दिसली नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर बहिणींची आठवण झाल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. महाराष्ट्रात तरुणांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचा दावा प्रियांका गांधी यांनी केला. त्या गडचिरोली येथे आयोजित सभेत बोलत होत्या. प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपचे नेते शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मोठमोठ्या बाता करतात. तसेच शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षांपूर्वी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन केले होते. परंतु, अद्याप काम सुरू केले नाही. भ्रष्टाचारामुळे सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा देखील कोसळला. एक है तो सेफ अशा घोषणा दिल्या जात आहे. मोदींच्या राज्यात केवळ अदाणी हेच सेफ आहेत. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, मजूर, महिला आणि उद्योग सुरक्षित नाहीत. केवळ पोकळ घोषणा केल्या जातात. निवडणुकीनंतर काहीही होत नाही, असा घणाघात प्रियांका गांधी यांनी केला. काँग्रेसने इतर राज्यात दिलेली गॅरंटी पूर्ण केली
काँग्रेस सरकारने इतर राज्यांत गॅरंटी दिली होती. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश मध्ये दिलेली गॅरंटी निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण केली. निवडणुका जवळ आल्यावर मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित केले जाते. जाती, धर्माच्या आधारावर जनतेचे लक्ष विचलित केले जाते. सरकार जनतेला उत्तरदायी असते, पण भाजपने मागील 10 वर्षांपासून ही परंपरा मोडीत काढली आहे. महाराष्ट्रात तरुणांच्या सर्वाधिक आत्महत्या
गेल्या 10 वर्षांत महागाई प्रचंड वाढली आहे. महागाईमुळे लोक सण साजरे करू शकत नाहीत. जीएसटीमुळे छोटे दुकानदार, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सरकारी परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. आज महाराष्ट्रात अडीच लाख पदे रिक्त असून ते भरले नाहीत. महाराष्ट्रात तरुणांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचा दावा प्रियांका गांधी यांनी केला. मागील अडीच वर्षांत महायुतीने काहीही केले नाही. लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली. जनता टॅक्सवर टॅक्स भरत आहेत, पण उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. पेसासारखे कायदे कमकुवत करत आहेत
युपीएच्या काळात ताडोबा अभयारण्याला मायनिंगपासून वाचवले होते. त्या आलेल्या प्रस्तावाला नाकारले होते. मोदी सरकाने २०२० ने 41 कोळसा खाणींची प्रक्रिया सुरू केली होती. महाविकास आघाडीने त्यावर ब्रेक आणला होता. पण आज अशा गोष्टींवर कोणतेही बंधन नाही. तुमच्या जमिनी खाणीसारख्या गोष्टींसाठी हडप केल्या जात आहेत. अदाणीसारख्या उद्योगपतींसाठी योजना आणल्या जात आहेत. पाणी, डोंगर, जंगल यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, अन्यथा पृथ्वी नष्ट होईल. आज पेसासारखे कायदे कमकुवत केले जात असल्याचा दावा प्रियांका गांधी यांनी केला. काँग्रेसने महाराष्ट्रासोबत भेदभाव केला नाही
भारताच्या संस्कृतीत आणि राजकारणात गडचिरोलीचे वेगळे महत्व आहे. संविधानाचा पाय रचला आहे. समानता आणि एकता येथून आले आहेत. येथील संतांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला. हा देश एक राहिला, तरच आपण पुढे जाऊ शकतो. काँग्रेस सरकारने महाराष्ट्रात कधीही भेदभाव केला नाही. पण आज महाराष्ट्रासोबत भेदभाव होत आहे. महाराष्ट्रात येणारे मोठमोठे उद्योग बाहेर नेले जात आहे. सेमी कंटक्टर, एअर बस, सॅफ्रेन यांसारखे मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेले. 6 हजारांपेक्ष जास्त कंपन्या बंद पडल्या आहेत, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या. महायुती सरकार महिलांचे संरक्षण करू शकत नाही
महायुतीच्या महापापांना महाराष्ट्राच्या पावण भूमीत गाडायचे आहे. महाराष्ट्रातील 2 लाख 53 हजार महिला व तरुणी बेपत्ता आहेत. शिंदे-फडणवीस सरकार महिलांचे संरक्षण करू शकत नाही. राज्यातील 7 लाख कोटींचे उद्योग आणि गुंतवणूक गुजरातला पळवले जात आहे. 50 लाख तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे काम महायुती सरकारने केले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. एका खिशात टाकायचे आणि दुसऱ्या खिशातून काढायचे
सत्तेच्या लालसेपायी पक्ष फोडणारे, चिन्ह पळवणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. हे गरिबांचे सरकार असल्याचे म्हणत आहेत, पण 50 कोटीमध्ये आमदार खरेदी करून महिलांना दीड हजार देतात. पहिले दीड हजार दिल्यानंतर त्याचदिवशी तेल 50 रुपयांनी महाग केले. अशाप्रकारे प्रत्येक दीड हजाराला वीज बील 33 टक्क्यांनी महाग केले. 130 रुपयांची तुरीची डाळ 150 रुपये केली. एका खिशात टाकायचे आणि दुसऱ्या खिशातून काढायचे, असा हा प्रकार सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)