भाजप स्वतः बहुमताच्या जादुई आकड्याजवळ:राष्ट्रवादीची शर्यतीतून माघार, मग महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे घोडे नेमके अडले कुठे?
2 hours ago
1
महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घोषित केला नाही. सूत्रांच्या मते, भाजप नेतृत्वाला जातीय समीकरणापासून एनडीएच्या सर्वच सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. यामुळेच गत 4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. एकीकडे मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस चर्चेत आहेत. भाजपपुढे ओबीसी समुदायाचे मतही विचारात घ्यावे लागणार आहे. चला तर मग पाहूया महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे घोडे नेमके कुठे अडले? 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 57 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपने या निवडणुकीत आपले 149 उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने 81 व राष्ट्रवादीने 59 जणांना तिकीट दिले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा राज्यशकट हाकतील. भाजपचे पर्यवेक्षक सहकारी पक्षांना घेणार विश्वासात नव्या मुख्यमंत्र्याचा निर्णय घेण्यापूर्वी भाजप आपल्या मित्रपक्षांसह आमदारांचे मत जाणून घेणार आहे. पक्षाचे निरीक्षक लवकरच मुंबईत पोहोचतील. ते तिथे प्रथम मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतील. त्यानंतर ते भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होऊन ते आपल्या आमदारांशी सल्लामसलत करतील त्यानंतर महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळेच भाजपने अद्याप महायुतीमधील कोणत्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार? हे स्पष्ट केले नाही. भाजपच्या नेतृत्वाची नेमकी काय इच्छा? सूत्रांच्या मते, भाजपला महाराष्ट्रात मोठा विजय मिळाला. त्यामुळे राज्यात आपलाच मुख्यमंत्री व्हावा अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची निवड करताना कार्यकर्त्यांची भावना विचारात घेण्याची गरज भाजप नेतृत्वाने व्यक्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? हे ठरवण्यात कोणताही वाद नाही. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. पण एकनाथ शिंदे व अजित पवार यांना कोणते मंत्रिपद द्यायचे? यावर अद्याप निर्णय झाला नाही. एकनाथ शिंदेंना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न भाजप यासंबंधी योग्य समन्वयाशिवाय कोणताही निर्णय होणार नाही याची काळजी घेत आहे. यामुळे गत 4 दिवसांपासून त्यांची महायुतीच्या घटकपक्षांशी चर्चा सुरू आहे.
आतापर्यंत एकनाथ शिंदे व त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला संतुष्ट करण्याचे मोठे आव्हान होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांना आपली पहिली पसंती असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. आता पाहू भाजपच्या मार्गातील अडथळे कोणते?
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)