भाजपाची लाडक्या बहिणींनंतर अपक्षांकडून अपेक्षा:भाजप प्रदेशाध्यक्षांनी अपक्षांना सोबत घेणार असल्याचे केले सुतोवाच
5 hours ago
1
लाडक्या बहिणींनी विधानसभेत मतांची भरघोस ओवाळणी टाकली. लोकसभेपेक्षा महिलांच्या मतात ८ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा फायदा भाजपाला होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितले आहे. आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण अपक्षांना सोबत घेणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय जनता पक्षाला १०५ पेक्षा जास्त जागा मिळणार असून महायुतीला १५० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. इतकेच नाही तर अपक्ष उमेदवार हे विकासासाठी आमच्या बाजूने असतील, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे राज्यात देखील भाजप सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास त्यांनी केला. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देखील राज्यात चांगली कामगिरी आहे, असे ते म्हणाले. राज्यात आमचे बहुमता पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांची गरज भासली तरी त्यांची मदत घेणार आणि गरज भासली नाही तरी देखील त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. निवडून आलेला आमदार हा लोकांचा प्रतिनिधी असतो. निवडून आल्यानंतर त्याच्या मतदारसंघात विकासाची कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुमत असले किंवा नसले तरी अपक्ष आमदार विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राहतील असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)