भाजपाच्या फोडाफोडीमुळे आम्ही अलर्ट:आमदारांना तातडीने हलवण्याची तयारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती
5 hours ago
1
निवडून आलेल्या आमदारांना तातडीने हलवण्याची तयारी आमची आहे. भाजपने राजकीय व्यवस्थेत आमदार फोडण्याची पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे आम्ही अलर्ट राहू. आम्ही सगळीकडे नजर ठेवून आहोत अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. अपक्ष उमेदवारांसोबतही आमचा संपर्क सुरू आहे असे ते म्हणाले. लढत थोडी टफ झाल्यास हरियाणामध्ये घातला तसा घोळ भाजपा इथे घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही अलर्ट राहणार आहोत. मी स्वतः उद्या सर्व उमेदवारांशी बोलणार आहे. शिंदेसेनेचे प्रवक्ते शिरसाट यांनी शरद पवारसोबत जावू असे वक्तव्य केले आहे. परवा निकाल लागत आहे. निकालानंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडी होतील. भाजपबरोबर कोणीच राहायला तयार नाही. होणाऱ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहो. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. राहिला प्रश्न मुख्यमंत्री कोण होणार याचा. तर आधी बहुमत येवू द्या, मग पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेवू असे पटोले यांनी सांगितले. वाढलेल्या मतदानाचा लाभ आम्हालाच होईल असे ते म्हणाले. नाना पटोले मुख्यमंत्री होणार असतील तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचे नाव जाहीर करावे असे संजय राऊत म्हणाले. त्यावर बोलताना पटोले यांनी मुख्यमंत्री पदा संदर्भात कुठलीही चर्चा नाही. यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेईल असे ते म्हणाले. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. हे चालत राहणार आहे. परवा निकाल येणार आहे. त्या नंतर सगळे चित्र स्पष्ट होईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)