भाजीपाला, टरबूज लागवडीचे क्षेत्र वाढले:मधमाशांच्या अभावाने उत्पादन अडचणीत, सिल्लोड तालुक्यात पाणी बचतीसाठी मल्चिंग पेपरच्या वापरावर भर
3 hours ago
1
पिंपळदरी पारंपरिक शेती केल्याने उत्पन्न कमी आणि कष्ट व खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करून पिकांना जीवनदान देत आहेत. सिल्लोड तालुक्यात अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. भाजीपाल्यासह इतर पिकांसाठी शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करत असून या पेपरमुळे जमिनीत तणाची वाढ होत नाही. पिकांसाठी पाणीदेखील कमी लागत आहे. परिणामी, हा पेपर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. पारंपरिक शेती केल्याने उत्पन्न कमी आणि कष्ट व खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत. (ता - सिल्लोड) पेंडगाव येथील शेतकरी कौतिक दादाराव दांडगे यांनी आपल्या शेतातील १८ गुंठ्यामध्ये डिसेंबर महिन्यात २३ २०२४ बाहुबली टरबूज रोपाची लागवड बेडवर ठिबक मल्चिंग पेपरच्या सहाय्याने सहा बाय चारवर केली आहे. पिकाच्या लागवडीचे अंतर दोन फूट आहे. बाहुबली टरबूजाचे रूप चांगले असल्याने ते शेतकरी निवडले आहे. सध्या हे पिक जोमात असून शेती बहरत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा आठवड्यात टरबूज पीक तोडणीला येईल. या अनुषंगाने मी टरबूज पिकाची लागवड केली आहे. सिल्लोड तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस आधुनिक शेती करण्यावर भर देत आहेत. परंतु अनेकदा निसर्ग साथ देत नसल्याने संकटात सापडतात. असा आला एकूण खर्च; रासायनिक खते व कीटकनाशकांसाठी ३ हजार नेरी येथून नर्सरीमधून रोपे आणली आहेत. टरबूज बहुबली वाणाची आहे. एकूण २७०० - वाहतूक खर्च - ८५०० रु - लागवड खर्च - १२०० रु मल्चिंग पेपर ३००० हजार खते व कीटकनाशक औषधी ५००० हजार ठिबक १५००० हजार बेड पाडणे १५०० रु एकूण झालेले खर्च - ३६,९०० मधमाशांचे प्रमाण घटले टरबूजाच्या फळधारणेसाठी मधमाशा महत्त्वाची आहेत. मधमाश्यांचे प्रमाण घटल्याने यंदा टरबूजाच्या वेलींना फळ लागण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी गुळाचे पाणी करून ते फेकणे किंवा गुळवेल वाढवण्यासाठी गोणपाटावर टाकून पिकात ठेवणे आदी उपाय शेतकरी करत आहेत. फळ धारणेचे प्रमाण कमी यंदा टरबूजाचे केवळ वेल झपाट्याने वाढत आहेत. मात्र फळाचे प्रमाण कमी आहे. मधमाशी घटल्यामुळे होते की बियाण्यांचे फळधारणा क्षमता घटली आहे हे सध्या कळायला मार्ग नाही. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी कौतिक दांडगे यांनी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)