Published on
:
05 Feb 2025, 6:27 am
Updated on
:
05 Feb 2025, 6:27 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वाचे लक्ष १९ फेब्रुवारीपासून सुरु होणार्या चॅम्पियन ट्रॉफीकडे वेधले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स ( Pat Cummins) दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ( Champions Trophy 2025 ) खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे, स्मिथ आणि ट्रॅव्हिस हे कर्णधारपदासाठी मोठे दावेदार आहेत, असे वृत्त ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या हवाल्याने ESPNCricinfo ने दिली आहे.
पॅट कमिन्स याच्या पत्नीची प्रसूती झाली. तिने मुलाला जन्म दिला. या कौटुंबिक कारणास्तव तो श्रीलंका कसोटी दौर्यापासून मुकला. तसेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अति गोलंदाजीमुळे घोट्याच्या समस्येवर तो सध्या उपचार घेत आहे. त्यामुळे कमिन्सला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे कठीण वाटतेय. गेल्या काही काळापासून घोट्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला पॅट कमिन्स अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही त्याला वगळलं जाईल, असे मानले जात आहे.
Who should replace Cummins and Hazlewood for the Champions Trophy if they are not fit in time? 🤔
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 5, 2025आम्हाला नवीन कर्णधाराची गरज : मॅकडोनाल्ड
आता श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही पॅट कमिन्स उपलब्ध असणार नाही. तसेच संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हाही दुखापतींवर उपचार घेत आहे. पॅट कमिन्स सराव सुरू करू शकला नाही म्हणून तो चॅम्पियन ट्रॉफीत खेळताना दिसण्याची शक्यता नाही. त्यामुळे आम्हाला नवीन कर्णधाराची गरज आहे, असेही प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ तयार करताना आम्ही स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्याशी चर्चा करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण
ऑस्ट्रेलियाला अष्टपैलू खेळाडूंच्या विभागात इतर दुखापतींची चिंता आहे. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पॅट खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड देखील पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगितले जात आहे. जोश हेझलवूडला कंबरेचा त्रास आहे आणि त्याचे खेळणे देखील खूप कठीण मानले जात आहे.मिशेल मार्श पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकण्याची शक्यता आहे.
स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅव्हिस हेड यांच्याकडे कर्णधारपद सोपवता येईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नवीन कर्णधाराचा शोध सुरू केला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या मते, कमिन्सने अद्याप गोलंदाजी सुरू केलेली नाही. अशा परिस्थितीत त्याला खेळणे अशक्य आहे. मॅकडोनाल्ड म्हणाले की, ते आता कर्णधारासाठी पर्याय शोधत आहेत. ज्यामध्ये त्याने संघातील स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅव्हिस हेड यापैकी एकास कर्णधार बनवण्याबद्दल बोलले आहे.कमिन्ससोबत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमचा अंतिम संघ तयार करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड दोघांबरोबर आम्ही चर्चा करत आहोत.”
सीन अॅबॉटला वन-डे पुनरागमानाची संधी
कमिन्स आणि हेझलवूडची अनुपस्थिती सीन अॅबॉटसाठी एकदिवसीय संघात परतण्याची दारे उघडू शकते, जो सुरुवातीला खराब फॉर्ममुळे गमावला होता. स्पेन्सर जॉन्सन देखील एकदिवसीय संघासाठी श्रीलंकेला जाणार असल्याने तो संघात सामील होण्याची शक्यता आहे.