रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून इन्कम टॅक्स विभागाकडून ही छापेमारीची कारवाई सुरु आहे.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाकडून आज धाड टाकण्यात आली आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच आयकर विभागाकडून साताऱ्यातील फलटण आणि पुण्यात अशा दोन ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या घरात इन्कम टॅक्सच पथक आहे. पुण्याच्या प्रभात रोडवर संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं घर आहे. काही कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर संजीवराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांना साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीत असतानाही त्यांनी भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत रामराजे आणि संजीवराजे या दोन्ही बंधूंनी भाजपच्या उमेदवाराला शेवटपर्यंत पाठिंबा दिला नाही. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी संजीवराजे निंबाळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आज त्यांच्या फलटण आणि पुण्यातील धरावर आयकरने छापा टाकल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
Published on: Feb 05, 2025 02:03 PM