परभणी (Parbhani) :- शहरालगत जायकवाडी पैठण डावा कालवा व त्यावरील वितरिकांभोवती अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. पाटबंधारे (Irrigation)विभाग क्र.२ परभणी कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सर्व्हे केल्यानंतर सव्वाशेवर अतिक्रमणे आढळली. संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.
संबंधितांना बजावल्या नोटिस
परभणी शहरालगत जायकवाडी पैठण डावा कालवा व त्यावरील वितरिकांभोवती मागिल काही दिवसापासून अतिक्रमण (Encroachment) वाढत आहे. ५ जानेवारी रोजी मध्य रात्री पैठण डावा कालवा सा.क्र. २०५ ते २०८ दरम्यान कालव्याच्या दोन्ही बाजूस अतिक्रमण सुरू झाले. तात्पुरते टीन पत्र्याची घरे उभारण्याची तयारी चालू आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अभियंता यांनी केलेल्या सर्व्हेत निदर्शनास आले आहे. मात्र यात कोणताच फरक पडला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन पुढे काय कारवाई करते, याकडे अतिक्रमणधारकांचे लक्ष लागले आहे.