जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे, या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे, दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी चार सुसाईड नोट लिहिल्या होत्या, त्या आता पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचं कारण आता शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून समोर आलं आहे.
चिठ्ठ्यांमध्ये काय म्हटलं?
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे, त्यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. पहिली चिठ्ठी त्यांनी आपले आई, वडील आणि बहिणीला लिहीली आहे. दुसरी चिठ्ठी त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला लिहिली, तिसरी चिठ्ठी आपल्या कुटुंबाला तर चौथ्या चिठ्ठीतून त्यांनी आपल्या मित्रांना शेवटाचा संदेश दिला आहे. या चिठ्ठ्यांमधून त्यांनी आत्महत्या का केली? याचं कारण देखील समोर आलं आहे.
‘ माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना ही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, त्यापैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या. अशी विनंती महाराजांनी या चिठ्ठीमधून आपल्या मित्रांना केली आहे.
मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची ही महाराजांनी माफी मागितली. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग. असं शिरीष महाराज यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला उद्देशून म्हटलं आहे.