नवेगावबांध (Gondia):- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील भर वस्तीत काल रानडुकराने (wild boar) प्रवेश केला. त्यामुळे एकच खळबळ माजली. एवढेच नाही तर लोकांनी आरडाओरड करताच, एका रान डुकराने बस स्थानक परिसरात असलेल्या जिभकाटे गुरुजींच्या चक्क घराच्या छतावर आश्रय घेतला.
वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन
या डुकराला जायबंद करण्यासाठी वन विभागाने तीन ते चार तास रेस्क्यू ऑपरेशन राबविले. परंतु सदर रानडुकराने वनविभागाच्या चमुच्या हातावर तुरी देऊन इमारतीच्या मागच्या बाजूला उडी मारत रेल्वे मार्ग ओलांडत पळ काढल्याने नागरिकांनी सुटकेच्या नि:स्वास घेतला. नवेगावबांध येथे मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १० वाजता सुमारास रानडुकराचा कळप शिरला. अचानक रानडुकर पाहून गावातील काही लोकांनी आरडाओरड सुरू केली. यामुळे भरकटलेले रानडुकर सैरावैरा पळ काढू लागले. त्यातच एक रानडुकरं चक्क घराच्या छतावर चढले. जीभकाटे गुरुजी यांच्या घरावर छतावर चढले. लोकांना छतावर दिसल्यावर एकच खळबळ उडाली.
परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले
याची माहिती काहींनी वन विभागाला (Forest Department) दिली. जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. ज्या जिन्याच्या पायर्यावरून डुक्कर छतावर चढला होता त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. वर छतावर रस्त्याच्या बाजूने जाळी लावण्यात आली.परंतु जलद बचाव पथकाला चकमा देत रानडुक्कर चक्क मागच्या बाजूने रेल्वे लाईन कडे पळून गेला. प्रादेशिक वनविभागाच्या जलद बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबविला.मेन रोडवर बरेच वेळ वाहतूक खोळंबली होती.नेमके काय होत आहे? हे कोणालाच कळले नव्हते, त्यामुळे बाहेर गावावरून येणारे व स्थानिक विद्यार्थी, नागरिक याच रस्त्याने जात होते.परंतु ऑपरेशन स्थळी लोकांना दोन्ही बाजूला रोखण्याचा तगडा बंदोबस्त मात्र दिसला नाही.
घटनास्थळाजवळून विद्यार्थी, नागरिक बिंदास रस्त्याने येणे जाणे करत
त्यामुळे वन विभाग कर्मचार्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून घटनास्थळाजवळून विद्यार्थी, नागरिक बिंदास रस्त्याने येणे जाणे करत होते. जर रानडुकरांनी छतावरून जर उडी मारली असती, तर त्याची किंमत किती लोकांना मोजावी लागली असती? परंतु, असा अनर्थ टळला. हे सर्व करत असताना काय दक्षता घ्यायला पाहिजे होती..? याचे भान मात्र उपस्थित वन विभागाच्या कर्मचार्यांना दिसले नाही. काहीं उपस्थित दर्शक नागरिकांनी पोलिसांना पाचारण करावे की जेणेकरून या मार्गाने रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) पूर्ण होईपर्यंत कोणी जाऊ नये. परंतु एक वन कर्मचारी म्हणाले आम्हीच सर्व करू शकतो. पोलिसांची काही गरज नाही. पण जाणारे येणार्यांची गर्दी वन विभागाचे जलद बचाव पथक नियंत्रित करू शकला नाही.हे येथे उल्लेखनीय आहे.