गेल्या 11 वर्षांपासून दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. विविध संस्थाकडून करण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे, तर आपची पिछेहाट होताना दिसत आहे. हा केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो.
काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?
चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये सत्ताधारी आपला 25 ते 28 इतक्या जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 39 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. दिल्लीमध्ये भाजपला 45 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या दोन जागा येऊ शकतात. डीव्ही रिसर्च अनुसार भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 25 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्व एक्झिट पोलचा सूर असाच आहे की, यावेळी दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
केजरीवालांचं गणित नेमंक कुठं चुकलं?
गेली दोन टर्म दिल्लीमध्ये आप सत्तेत आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वातील सरकारवर गेली दहा वर्ष तेथील जनतेने एवढा विश्वास दाखवला की दिल्लीमध्ये आपने अनेक रेकॉर्ड तोडले. मात्र यावेळी भाजप आणि काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणुकीत जोरदार रंगत आणली, भाजपकडून केजरीवाल यांची व्होटबँक टार्गेट करण्यात आली. मुस्लिम आणि दलित बहुसंख्य असलेल्या मतदारसंघात केजरीवाल यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच दहा वर्ष दिल्लीमध्ये आप सत्तेत आहे, त्यामुळे त्यांना अँटी इन्कमसीचा देखील फटका बसू शकतो. ऐन निवडणूक तोंडावर असताना अरविंद केजरीवाल यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले, त्याचा देखील फटका बसताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे एक्झिट पोलनुसार काँग्रेसचा देखील मोठा पराभव होताना दिसत आहे.