दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी पूर्णा येथील रेल्वे स्थानक व परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी केली.Pudhari Photo
Published on
:
05 Feb 2025, 4:46 pm
Updated on
:
05 Feb 2025, 4:46 pm
पूर्णा : भारतीय रेल्वे मंत्रालयाने अंमलात आणलेल्या अमृत भारत स्टेशन विकास योजनेअंतर्गत पूर्णा रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. त्या अनूषंगाने या योजनेतील प्लॅनिंगनूसार करण्यात येणा-या विकास कामाचे निरीक्षण करून आढावा घेतला जात आहे. असे दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी सांगितले. पूर्णा येथील रेल्वे स्थानक व परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी ते आज (दि.५) दुपारी आले असता दै. पुढारी शी बोलत होते.
जैन हिंगोली येथून विशेष वातानुकूलित रेल्वे गाडीने दुपारी अडीचच्या दरम्यान पूर्णा रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकारी टिमसह स्थानकातील उपपदार्थ कैंटिन, रेल्वे स्थानक परिसर ट्रॅक, नवीन इमारत बांधकाम, स्थानकाअंतर्गतचे दादरा ब्रिज, रनिंग रुम रेल्वे कर्मचारी विश्रामगृहासह आदी बाबींचे निरीक्षण करुन कामासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. याप्रसंगी रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांची टिम, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.