आईला शिवीगाळ केल्याप्रकरणी रागाच्या भरात मुलाने वडिलांची हत्या केली होती.File Photo
Published on
:
05 Feb 2025, 6:14 pm
Updated on
:
05 Feb 2025, 6:14 pm
वर्धा : आईला शिवीगाळ केल्याप्रकरणी रागाच्या भरात मुलाने वडिलांची हत्या केली होती. या मुलावर देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी (दि.५) अटक करण्यात आली. नामदेव कुरवाडे (वय २७, रा. देवळी ) अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी येथील नारायण चिंधूजी करवाडे (वय ६०) यांनी घटनेच्या दिवशी पत्नीला घरगुती कारणातून शिवीगाळ केली. वडिलांनी आईला शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात मुलगा नामदेव कुरवाडे याने वडिलाच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केला. त्यात नारायण कुरवाडे याचा जागीच मृत्यू झाला होता . घटनेनंतर नामदेव फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार केली. परिसरातील शिवारात लपून बसलेल्या नामदेव कुरवाडे याचा शोध घेत अटक केली. ही कारवाई पोलिस निरिक्षक रवींद्र शिंदे, कुणाल हिवसे, नितिन तोडासे, गणेश इंगळे, सागर पवार, मनोज नफ्ते यांनी केली. देवळी पोलिस पुढील तपास करीत आहेत.