परळ येथील नरे पार्प येथे माणदेशी महोत्सव सुरू आहे. याअंतर्गत शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता ‘माणदेशी शेतकरी परिषद’चे आयोजन करण्यात आले आहे. या शेतकरी परिषदेस शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
माणदेश हा दुष्काळप्रवण भाग. दुष्काळामुळे दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. अनिश्चित हवामान, खतांच्या वाढत्या किमती, खर्चिक तंत्रज्ञान आणि सरकारी पाठिंब्याचा अभाव अशा अनेक अडचणींवर मात करून माणदेशी फाऊंडेशनच्या मदतीने तिथला शेतकरी उभा राहिला. काही शेतकऱ्यांनी माणदेशी फाऊंडेशनच्या माती-पाणी चाचणी, पृषी प्रशिक्षण, पृषी अभ्यास सहल या नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या मदतीने अभिनव शेती करत शेतीतून कोटींचा टप्पा गाठला. त्यांच्या या प्रयत्नास एचएसबीसीचे सहाय्य लाभले. या यशस्वी शेतकऱ्यांचा प्रवास शेतकरी परिषदेत उलगडला जाणार आहे. विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि एआय-तंत्रज्ञान कौशल्यांचा या शेतकऱ्यांनी कसा वापर केला याची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.