जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवटेकडी, दत्तटेकडी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून लवकरच या भागातील पाणी समस्या दूर होणार आहे.
जोगेश्वरी पूर्वेकडे असणाऱ्या शिवटेकडी, दत्तटेकडी या भागात होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी समर्थनगर उदंचन पेंद्र येथील कमी (70 एचपी) क्षमतेचे पंप बदलण्याची मागणी होत होती. माजी नगरसेवक आणि विद्यमान आमदार बाळा नर तसेच माजी नगरसेविका मंजिरी परब यांनी समर्थनगर उदंचन केंद्रात (175 एचपी) क्षमतेचे पंप बसविण्यात यावे यासाठी सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार मजास नाल्यावर स्लॅब टापून पूर्वीपेक्षा डबल क्षमतेच्या उदंचन केंद्रची निर्मिती करण्यात आली असून ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहे.
आमदार बाळा नर यांनी या उदंचन केंद्राच्या कामाची पाहणी पालिका अधिकाऱ्यांसोबत केली आणि लवकरात लवकर उदंचन पेंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, उपविभागप्रमुख बाळा साटम, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, मंदार मोरे, अंकुश मोर्वेकर, गुरू परब आदी उपस्थित होते.