ज्योतिष शास्त्रात वास्तु शास्त्राला अत्यंत महत्त्व असतं. अनेक जण आपलं घर वास्तुशास्त्रानुसार बांधतात, मात्र घरात ज्या वस्तू ठेवल्या जातात त्या जर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या विशिष्ट दिशेला ठेवल्या नाहीत, किंवा अयोग्य दिशेला ठेवल्या तर घरावर अनेक संकटं येतात,अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये केवळ वस्तूबाबतच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये तर विविध वृक्ष, प्राणी यासंदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं ही खूप शुभ असतात. ही झाडं जर तुमच्या घराच्या परिसरामध्ये घराच्या समोर किंवा पाठिमागे असतील तर तुमचं कल्याण होतं. घराची भरभराट होते. लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहाते. मात्र अशी काही वृक्ष असतात ती जर तुमच्या घराच्या परिसरात असतील तर तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो.आज आपण अशाच काही वृक्षांबाबत माहिती घेणार आहोत.
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना शुभ म्हटलं गेलं आहे. ज्या वृक्षांमुळे तुमच्या घरामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा राहाते.लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहाते. घरातील वास्तुदोष दूर होतात. अशा वृक्षांमध्ये वड, उंबर, तुळस, आणि फळ देणारी मात्र काटेरी नसलेल्या वृक्षांचा समावेश होतो. वड, उंबर अशा महाकाय वृक्षांमुळे तुमच्या आसपास ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणात राहाते. तसेच या झाडांखाली देवाचं वास्तव असतं असं देखील मानलं जातं. त्यामुळे ही झाडे शुभ मानली जातात. वास्तुशास्त्रामध्ये देखील या झाडांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे अशी काही झाडं असतात ज्यांना वास्तु शास्त्रात अशुभ मानलं गेलं आहे. अशी झाडं जर तुमच्या घरासमोर असतील तर त्या झाडांमुळे कायम तुमच्या घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहाते असं वास्तू शास्त्र सांगतं. ज्यामध्ये लिंबुनीच्या झाडाचा समावेश आहे. लिंबुनीच झाडं हे दारासमोर असू नये असं मानलं जातं. या झाडाला असलेल्या काट्यांना नकारात्मक ऊर्जेच्या रुपात पाहिलं जातं. या वृक्षाप्रमाणेच घराच्या समोर पपई आणि केळीचं झाडं देखील असू नये असं मानलं जातं. या वृक्षांना अशुभ मानलं गेलं आहे.हे वृक्ष तुमच्या घरासमोर असू नये असं वास्तू शास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)